पुण्याच्या आरोपीने रूईच्या म्हसोबा यात्रेत हवेत केला गोळीबार? मात्र पोलिसांकडून नाकार
खुनाच्या आरोपातून जामीनावर असलेल्या आरोपीचा दहशत माजवण्याचा प्रयत्न
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- पुण्यातील खूनाच्या गुन्ह्यांमध्ये जामीनावर सुटून आलोलेल्या आरोपीने भीमा नदीच्या काठावर असलेल्या रूई म्हसोबा येथील यात्रेमध्ये मागील भांडणाचा राग मनात धरून वडापाव,भजी विक्रेत्याला आपल्या साथीदारांसह लोखंडी रॉड,लाकडी दांडक्याने मारहाण करीत असताना भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या लोकांवर आपल्या जवळ असलेल्या बंदुकीने ( गावठी कट्ट्याचे ) पायावर व हवेत तीन गोळ्या मारुन गोळीबार करुन दहशत माजवून पलायन केल्याची घटना मंगळवार दि.३१ रोजी सकाळी ११ वाजणेचे सुमारास घडल्याने यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरू व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माढा तालुक्यातील कोंढार भागात प्रसिद्ध देवस्थान असलेल्या रूई येथील म्हसोबा देवस्थान येथे आज मंगळवार निमित्त यात्रा असते या यात्रेसाठी हजारो भक्त येत असतात मंगळवारी सकाळी 10.30 चे सुमारास संशयित आरोपी आरमान अल्लाउद्दीन शेख व राहणार रुई तालुका माढा जिल्हा सोलापूर हा आपल्या एक साथिदारासह मंदिराच्या बाजूला वडापाव,भजी व भेळ विक्रेता असलेल्या बशीर मौला मुलानी वय 30 राहणार रुई तालुका माढा यास भजी बनवत असताना दोघांचे वडीलामध्ये चार महिन्यामपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बशीर मुलानीच्या डोक्यात रॉड मारला व त्याचे साथीदाराने लाकडी दांडक्याने मारहाण करीत होते.मारहाण सुरु असताना यात्रेच्या नियोजनातील नागरिक आणि तरूणांनी सोडवा सोडली करताना संशयित आरोपी अरमान शेख याने कंबरेला असलेले गावठी पिस्तूल काढून हवेत फायरिंग केले भांडण सोडविण्यासाठी आलेल्या लोकांचे दिशेने जमीनीवर दोन ते तीन फायरिंग केले यामध्ये दुर्दैवाने कोणी जखमी झाले नाही मात्र यात्रेसाठी आलेले भाविकांची भीतीपुटी धांदर उडून पळापळ चालू झाली होती. या घटनेचे फक्त बघतात तालुक्यात चर्चा झाली असून. या फायरिंगच्या आवाजाने भाविकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्याने अनेक भाविकांनी देवाच्या दर्शनाला जाण्याचे आज टाळले तर जखमी बशीर मौला मुलानी हे टेंभुर्णीतील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत
असून वरील घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद जावेद बाळू काझी (वय 38), राहणार रूई तालूका माढा यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिरत दिली असून या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की या ठिकाणी गोळीबार झाला नाही मात्र ज्या ठिकाणी भांडणे झाले त्या ठिकाणी एक खाली पडलेले गोळी मिळून आले असून व झटापटीत त्याच्याजवळ कमरेला असलेला गावठी पिस्तूल खाली पडला व त्यातील गोळी जमिनीवर पडली अशी फिर्याद टेंभुर्णी पोलीस मध्ये दाखल झाले असून पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या पीएसआय स्वाती सुरवसे व पोलीस कॉन्स्टेबल सरडे तपास करीत आहेत वरील घटनास्थळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी भेट दिली असून पुढील तपास आरोपीचा शोध घेण्यासाठी एक पथक नेमले असल्याचे सांगितले आज 31 डिसेंबर असल्याने व उद्या नवीन वर्ष सुरुवात असल्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन टेंभुर्णी पोलीस स्टेशन ने कुठलीही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून कडक बंदोबस्त ठेवला आहे वरील दिलेल्या फिरादीवरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 790/ 24 भारतीय न्याय संहिता चे कलम 118/1, ३/५ शस्त्र अधिक नियम चे कलम 3,7,25 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे
0 Comments