Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने" दारू सोडा- दूध प्या" उपक्रम.

 मोहोळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने" दारू सोडा- दूध प्या" उपक्रम.



पोखरापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दिवंगत  धोंडीबा दादा उन्हाळे यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त ३१ डिसेंबर रोजी मोहोळ नगरपरिषद येथे "दारू सोडा -दूध प्या" उपक्रमाचे उद्घाटन मोहोळचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या हस्ते मोफत सुगंधी दूधाचे वाटप करुन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य श्रीधर उन्हाळे हे होते.

प्रास्ताविक ‌अंनिसचे राज्य सरचिटणीस सुधाकर काशिद यांनी केले. ते म्हणाले,सध्या व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस युवकांमध्ये वाढताना दिसून येत आहे . ही चिंतेची बाब आहे. दारू,तंबाखू , गुटखा  हे‌ कौटुबिक स्वास्थ्य बिघडविणारे‌ घटक आहेत, त्यामुळे ‌मानसाची क्रयशक्ती कमी होऊन देशाचे आर्थिक नुकसानच होते,याचे भान युवकांनी ठेवून दारु-गुटखा-तंबाखू‌ यांसारख्या व्यसना पासून दूर राहण्याचा संकल्प नववर्षाच्या स्वागतप्रसंगी‌ युवकासह सर्वांनी करावा. उद्घाटनप्रसंगी मोहोळचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते‌ म्हणाले की, सर्वांनीच व्यसनाधीनता  झटकून टाकावी आणि  आपली शरीर संपत्ती सुदृढ ठेवावी.  ‌दिवंगत धोंडिबा दादा ‌उन्हाळे यांच्या जयंतीनिमित्त माजी प्राचार्य श्रीधर उन्हाळे यांच्या पुढाकाराने व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने" दारू सोडा -दूध प्या "हा उपक्रम प्रेरणादायी व कौतुकास्पद‌ असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी ॲड. विनोद कांबळे, अंनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष धर्मराज चवरे,डी.सी.सी. बँकेचे मँनेजर ‌अनिल पाटील, किशोर पवार,रमेश दास, बाळासाहेब वाघमोडे, बाळासाहेब जाधव, हारुण शेख, शिवाजी बाबर, मनोजकुमार खडके, विजयकुमार चांदणे,पो.कांँ. गोपाळ साखरे, रमेश दास , महावीर वाघमारे, दादासाहेब पवार,दिपक ‌पारडे, प्रदीप माळी,मनोहर गोडसे, मोहन व्यवहारे, धनंजय आवारे , संपादक राजू साखरे सिताराम कांबळे आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार धर्मराज चवरे यांनी व्यक्त केले.
Reactions

Post a Comment

0 Comments