वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी देवदूत म्हणून धावून जाणाऱ्यांची
पोलीस प्रशासन यापुढे सन्मानाने दखल घेईल,परंतु वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी इंचगाव येथे दिला.येथील टोलनाका परिसरात जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा (ग्रामीण) सोलापूर व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने रस्ता वाहतूक सुरक्षा अभियान - कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी टोलनाका परिसरात वृक्षारोपण, दुचाकी चालकांना हेल्मेट वाटप, आरोग्य व नेत्र तपासणी हे सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यावेळी
अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर,मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड,जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे,पोलीस निरीक्षक अतुल मोहिते,पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार,उपनिरीक्षक सुखदेव गोदे, महामार्ग प्रोजेक्ट प्रबंधक सत्यनारायण गुजर, सुरक्षा प्रबंधक इंग्लेश शर्मा, टोळ व्यवस्थापक येतेंद्रसिंह, जकराया कार्यकारी संचालक सचिन जाधव, उद्योजक कन्हैया हजारे उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी,रस्ते अपघातानंतर जखमींना तातडीने मदत व वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे आहे. यासाठी घटनास्थळी असणाऱ्यांनी बघ्याची भूमिका न घेता अपघातग्रस्तांना तातडीने मदतीसाठी पुढाकार घ्यावा,आपली ही मदत एखाद्याचा
जीवच नव्हे तर त्याच्या विस्कळीत होणाऱ्या कुटुंबाला मोठा आधार देणारी ठरू शकते, असे भावनिक आवाहन केले.यावेळी महामार्ग टोळ विभागाचे अनुराग समर्थ, गौरव प्रताप, विकास राठोड, शिवानंद डे, गणेश बासाबत्ती, सागर रगडे, चंद्रशेखर सेलोरे, अमिन पटेल,शकील शेख, किरण लोकरे उपस्थित होते. सूत्रसंचालन अश्पाक बागवान यांनी केले. सुरक्षा प्रबंधक इंग्लेश शर्मा यांनी आभार मानले.
चौकट
जिल्ह्यात विशेष मोहीम यावेळी जिल्ह्यातील अपघाताचा वाढता आलेख कमी करण्यासाठी पोलीस
प्रशासनाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी विनापरवाना (लायसन्स), विनाबेल्ट, विनाहेल्मेट, ट्रिपल सीट, वेग मर्यादा याबाबत कायदेशीर बाबींचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर' कारवाई केली जाणार असून या बाबींना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मार्गावर पोलीस यंत्रणा दक्ष ठेवण्यात आली आहे. विशेषतः जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाबाबत प्रबोधन केले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
0 Comments