Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय सेवा योजना शिबिरा अंतर्गत भाळवणी येथे महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन

 राष्ट्रीय सेवा योजना शिबिरा अंतर्गत भाळवणी येथे महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन



  वडाळा (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजे भाळवणी येथे दिनांक 18 ते 24 जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे. या अंतर्गत भाळवणी गावातील महिलांसाठी विविध दिनांक 20 जानेवारी रोजी सायंकाळी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात संगीत खुर्ची , तळ्यात मळ्यात, उखाणे आणि लिंबू चमचा या खेळांचा समावेश होता .महिलांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग  सर्व खेळांमध्ये नोंदवला व त्याचा मनसोक्त आनंद लुटला. संगीत खुर्ची या खेळात सौ. दिपाली गायकवाड यांनी पहिला क्रमांक पटकाविला तर तळ्यात मळ्यात या खेळात सौ.सुजाता लिगाडे या विजयी ठरल्या. उखाण्यांच्या स्पर्धेत सौ. काजल भालेराव तर लिंबू चमचा या स्पर्धेत सौ.सुवर्णा कदम या विजयी ठरल्या. तसेच गावातील लहान मुलींसाठीही तळ्यात मळ्यात ही स्पर्धा  घेण्यात आली होती. त्यात कु.राणी कदम हिने प्रथम क्रमांक पटकाविला. विजयी ठरलेल्या स्पर्धकांना भाळवणी गावच्या उपसरपंचा सौ. सुजाता लिगाडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धा राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या स्वयंसेविकामार्फत घेण्यात आल्या. महिला सशक्तिकरण या उद्दिष्टावर आधारित शिबिरातील तिसरा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना एककाचे सर्व स्वयंसेवक आणि स्वयंसेविका तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी मोलाचे परिश्रम घेतले. 

Reactions

Post a Comment

0 Comments