तपासावर परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 7, 2025

तपासावर परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या

 तपासावर परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या




सर्वपक्षीय नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

संतोष देशमुख प्रकरणी बोलणाऱ्या नेत्यांच्या जीवाला धोका, फडणवीसांनी गांभीर्य ओळखावं - शरद पवार 

मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची आज छत्रपती संभाजी राजे यांच्यासह अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, ज्योती मेटे, सुरेश धस, बीडचे खासदार आमदारांनी भेट घेतली. याबाबत आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वांची मागणी एकच होती, की, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील तपासावर परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा घ्यावा असे धस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटत राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे धस म्हणाले. त्यांच्याकडे गृह खाते आहे. 
आम्ही छोट्या माणसांनी त्यांना सांगायची गरज नाही, आमची लायकी नाही असेही ते म्हणाले. 

अजित दादांवर माझा हक्क 

संभाजीराजे यांनी सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे धस म्हणाले. स्वपक्षाची कुठेही नाराजी नाही. मी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही बोलणार आहे. मी मात्र संतोष देशमुखबद्दल बोलणं थांबवणार नाही असेही धस म्हणाले. अजितदादांवर काय टीका केली, त्यांना लागायचं काय कारण आहे असेही धस म्हणाले. माझ्याकडून अनवधानाने एक शब्द अरे तुरे केला तो शब्द परत घेतलाय. अजित दादांवर माझा हक्क आहे अरे तुरे बोलण्याचा असेही धस म्हणाले. अजित पवार यांच्यासोबत मी फार काळ काम केले आहे. अधिकार वाणीने मी त्यांचा एकेरी उल्लेख केला होता असे सुरेश धस म्हणाले. एक नैतिक जबाबदारी म्हणून अरे तुरेची भाषा करायला नको होती, मी दिलगिरी व्यक्त करतो असेही सुरेश धस म्हणाले. 

वंजारी समाजाच्या 90 टक्के लोकांना हे पटलेले नाही

वंजारी समाजाच्या 90 टक्के लोकांना हे पटलेले नाही. गँग्ज ऑफ वासेपूर यांचाही त्रास मुकादमांना झाला आहे. त्यामुळे वंजारी समाजाचे मुकादम त्रासलेले आहेत असे धस म्हणाले. माझे दोन्ही मोबाईल तुमच्याकडे आहेत
त्यांच्या सोबत माझे संभाषण झालेले नाहीत असे धस म्हणाले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्यानंतर मी पुढे जाणारा कार्यकर्ता नाही असेही धस म्हणाले. मी या प्रकरणावर हृदयापासून बोलत आहे. इतर कुठल्याही विषयावर मी बोलत नाही. उद्या बावनकुळे यांचीही भेट घेणार असल्याचे धस म्हणाले. 

नितीन बिकड हा सहआरोपी होऊ शकतो

माझी माध्यमांना विनंती आहे की कदाचित नितीन बिकड हा सहआरोपी होऊ शकतो. आरोपी त्याने सांभाळले आहेत असेही सुरेश धस म्हणाले. आज किंवा उद्या हा बिकड आत जाऊ शकतो.
ज्यांचा रेकॉर्ड आहे, त्यांनी मला शिकवण्याची गरज नाही असे धस म्हणाले. माझ्यासोबत फोटो असेल तर प्रसिद्ध करा. याचा अर्थ आम्ही तेवढे जवळ नाहीत, जेवढ्या जवळ हे धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या जवळ आहेत असेही धस म्हणाले. मी सांगितल्या तारखेला हे तिथे दिसतील.19 जून 2024 मध्ये सातपुडा बंगल्यावर बैठक झाली होती. त्या बैठकीत हा नितीन बिकड होता. ओम साई राम कंपनी कुणाकडे आहे, ते तपासा असेही धस म्हणाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाविरोधात आवाज उठवणाऱ्या नेत्यांना येणाऱ्या धमक्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधी आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यावा आणि त्यांना राज्य सरकारमार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शरद पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्राची कॉपी 'एक्स' सोशल मीडियावर शेअर करत भूमिका मांडली. "बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते."

"बीड- परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत." असे पुढे शरद पवारांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages