गणपती फार्मसी मधे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 8, 2025

गणपती फार्मसी मधे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

 गणपती फार्मसी मधे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

 


 टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):-
मौजे अकोले खुर्द तालुका माढा येथील गणपती फार्मसी महाविद्यालयामध्ये भारतातील अग्रगण्य समाज सुधारक शिक्षक आणि कवी सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली.त्यांनी महिलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि अत्याचारित समुदायांच्या, विशेषतः महिला हक्कांसाठी लढा दिला.
महाविद्यालयातील शिवांजली मस्के,दिव्या केदार, रुशाली राऊत आणि उत्कर्ष कांबळे या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणांच्या परिदृश्याचा आकार आपल्या भाषणातून व्यक्त केला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड.विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबासाहेब येडगे, सचिव. डॉ. आर. डी. बेंदगुडे, डॉ. रूपाली बेंदगुडे डॉ.प्रशांत मिसाळ, ,इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.रुपाली राऊत व प्रियांका खडसरे यांनी कार्य केले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages