जयहिंद विद्यालय,जिल्हा परिषद शाळेत पत्रकार दिन साजरा.
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):-दि. 6 जानेवारी रोजी विद्यालयात,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत'पत्रकार दिन' साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. त्यांनतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. के.ठाकरे,गाडे,ज्येष्ठ शिक्षक जगन्नाथ धायगुडे यांनी करुन पत्रकार दिनाचे महत्व समजावून सांगितले. प्रास्ताविकानंतर क.तडवळे नगरीतील पत्रकार विकास उबाळे,बालाजी भांड,सुहास सावंत,किशोर कदम,संतोष सातारकर यांचा मानाचा फेटा,भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सत्कारानंतर विद्यालयातील तालुका,जिल्हा व विभाग स्तरावर यश संपदान केलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर म्हणून विकास उबाळे यांनी आपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर.डी.गाढवे,केशव पवार,रेहमान सय्यद हे होते. यावेळी शा.व्य.स सोमनाथ भोसले,अमोल पवार, सूभाष धनके,हनुमंत पवार,अरुण पाटील,शहाजी पुरी, येवलकर, देवसेठवाड व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाडे,शहाजी पुरी,संदीप पालखेव आभार प्रदर्शन रेहमान सय्यद,एस.टी.पालके यांनी केले.
0 Comments