फार्मसी च्या विद्यार्थ्यांना औषध निर्माण कंपन्यांमध्ये भरपूर संधी- - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 8, 2025

फार्मसी च्या विद्यार्थ्यांना औषध निर्माण कंपन्यांमध्ये भरपूर संधी-

 फार्मसी च्या विद्यार्थ्यांना औषध निर्माण कंपन्यांमध्ये भरपूर संधी-



टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):-  
 टेंभुर्णी मधील आर्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये रोल ऑफ क्वालिटी अॅशुरन्स विषयावरती व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याखानासाठी कैलास भोसले यांना आमंत्रित केले होते. कैलास भोसले हे लुपिन फार्मा. लि. गोवा येथे सिनीयर एक्सिक्युटिव्ह या पदावर कार्यरत आहेत.
या सेशन मध्ये त्यांनी विद्यार्थांना फार्मा इंडस्ट्री मधील कामकाजाबद्दल माहिती दिली. इंडस्ट्री मधील वेगवेगळे विभाग जसे की मॅन्युफॅक्चुरिंग,क्वालिटी कंट्रोल,क्वलिटी अॅशुरन्स,प्रोडक्ट डेव्हलपमेंट, रेगुलेटरी अफेअर्स व फंक्शन ऑफ क्वालिटी अॅशुरन्स या विषयावरती सविस्तर माहिती दिली व डि फार्मसीच्या उत्तीर्ण विद्यार्थांना औषधनिर्माण कंपन्यामध्ये अमर्याद संधी उपलब्ध आहेत असे प्रतिपादन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये तसेच गव्हर्मेंट फार्मासिस्ट व मेडिकल कोडींग मध्ये फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भरपूर संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.हर्षवर्धन वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक तुषार कन्हेरे, साक्षी देवकर, संजीवनी कुटे,प्रतीक्षा मुळे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages