Hot Posts

6/recent/ticker-posts

अमृतमहोत्सव युगपुरुषांचा

अमृतमहोत्सव युगपुरुषांचा

       समाजाला शक्तीशाली सामाजिक संघटन हवे आहे, ते काही केवळ लेबल म्हणून किंवा कोणत्या तरी प्रतीकांचे घाऊक प्रतिनिधी म्हणून नव्हे; किंवा एखाद्या थोर नेत्याची सावली मिळविण्यासाठी लोक सामाजिक संघटनेत जात नाहीत. त्यांना स्वत:ला काहीतरी परिवर्तन करून घ्यायचे आणि करायचे असते.. नव्वदीचे दशक हे याच परिवर्तनाच्या प्रारंभाचे ठरले. नव्वदीचे दशक हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात `सामाजिक’ व `राजकीय’ बदलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे दशक ठरते. आधीचीच `मानसिक गुलामगिरी’. त्यातल्या त्यात भांडवलशाही राजवटीचा समाजव्यवस्थेवर अंतर्बाह्य आणि वाईट परिणाम झालेला. या परिणामांना दिशा देणारी अशी कुठलीही संस्था अस्तित्वात नव्हती. अशातच युगपुरुष ॲड.पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी समाजाची ती गरज भरून काढत `मराठा सेवा संघ’ नावाने वैचारिक चळवळ सुरू केली.
         एकीकडे अस्थिरता, पक्षांतरे, आघाड्यांची पुनर्मांडणी वगैरे गोष्टींमुळे लोकांचा राजकीय व्यवस्थेवरील विश्वास मर्यादित राहिला.
गरज होती ती समाजाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या एका सामाजिक संघटनेची, ती उणीव भरून काढली युगपुरुष ॲड.पुरूषोत्तम खेडेकर साहेब यांनी...
      १९९० साली मराठा सेवा संघ स्थापन होणे, आज ३४ वर्षं पूर्ण होऊन ताकदीने उभा राहणे आणि या चळवळीत सामील होणाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत जाणे, ही ऐतिहासिक घटना खरीच, परंतु त्यामागे युगपुरुष ॲड.पुरूषोत्तम खेडेकर साहेब यांचे ‘सोशल इंजिनीअरिंग’ कारणीभूत आहे, ही सहज लक्षात येणारी गोष्ट आहे.
देशात युद्धखोरी , वर्णविव्देष , धर्मांधता आणि सांस्कृतिक संघर्ष पेटवत ठेवून मूळ प्रश्नांना बगल देण्याचे काम अव्याहतपणे चालू असतानाच युगपुरुष ॲड.पुरूषोत्तम खेडेकर साहेब यांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली. मराठा सेवा संघाची हीच खरी पार्श्वभूमी म्हणायला हरकत नाही.
मराठा सेवा संघ आणि युगपुरुष ॲड.पुरूषोत्तम खेडेकर साहेबांनी समाजाला काय दिले? तर एक काळ होता, छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर फक्त हिंदु-मुस्लिम दंगली घडवण्यासाठी केला जायचा. परंतु, शिवश्री  युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ही चुकीची परंपरा बंद केली. शिवरायांच्या नावाचा गैरवापर करणारे खरे चेहरे उघडे पाडले आणि खरे, वास्तव, लोकावश्यक शिवराय जनमानसांत रुजवले. महाराष्ट्रातील हिंदु-मुस्लिम दंगल होऊ नयेत म्हणून दोन समाजात सलोखा निर्माण केला.
      जिजाऊ माँसाहेब या व्यक्तिमत्वाविषयी फारसे कुणाला गांभीर्य नव्हते. परंतु, युगपुरुष अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सर्वप्रथम जिजाऊंचे चित्र तयार करून घेतले. नंतर त्यांच्या पत्नी  शिवमती रेखाताई खेडेकर या आमदार असताना ते चित्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने अधिकृत करुन घेतले आणि त्याचेच तैलचित्र महाराष्ट्र विधानसभेत बसवले. जिजाऊंचा खरा इतिहास समोर आणला. जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेडराजा येथे मातृतिर्थ उभे करुन आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सुरु केला. दरवर्षी १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवाच्या पर्वावर मातृतीर्थ-सिंदखेडराजा येथे बहुजन महापुरुषांच्या 'सत्य' इतिहासावरील कोट्यवधी रुपयांची पुस्तके व ग्रंथांची खरेदी होते. वास्तविक तलवारीच्या युगाचा केव्हाच अस्त झाला होता, त्यामुळे आजची तलवार ही लेखणी आहे,हे खेडेकर साहेबांनी समाजाच्या लक्षात आणून दिले.
जिजाऊंना प्रेरणास्थान मानून मानवतावादी, विज्ञानवादी
 “शिवधर्म” १२ जानेवारी २००५ रोजी स्थापन केला. बहुजनांच्या मूळच्या सिंधू संस्कृतीवर कोणीतरी त्याला झाकाळून-काळवंडून टाकणारी जी ब्राह्मणवादी, वैदिक, सनातनी, अवैज्ञानिक पुटं त्यावर चढवली होती, ती बाजूला सावरून “शिवधर्म” स्थापनेने सिंधू संस्कृतीच्या मूळ स्वरुपाला उजाळा दिला गेला.
भल्याबुऱ्या मार्गांनी कदाचित 'राष्ट्र' नावाचे दंड फुगवता येतील; पण संस्कृती उभारता-टिकवता येणार नाही. राष्ट्रे कालौघात गडप होतात; टिकते ती संस्कृती! पिकल्या फळासारखं हे खंडप्राय वैविध्यपूर्ण राष्ट्र आपल्या हाती लागलं, ते आपल्या हातात पूर्वजांच्या सांस्कृतिक उदारतेमुळे. आम्ही केवळ पाठ्यपुस्तकांमध्ये वाचलेल्या घडामोडी, ज्या वास्तविक आमच्या स्वतःच्या इतिहासाशी, आमच्या पूर्वजांशी संबंधित आहेत, नव्हे ती बीजं आमच्या पूर्वजांनीच रूजवली आहेत, अशा सिंधू संस्कृतीचा इतिहास, त्याचे महत्त्व, त्याचे महात्म्य आम्हाला युगपुरुष अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडेकर साहेबांमुळे कळले.
विविध प्रकारच्या विपुल स्त्री मूर्ती व मुद्रा पुरातत्वीय उत्खननात मिळाल्या आहेत. स्त्री देवता ह्या संस्कृतीतील आराध्य दैवत होत्या. सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती होती. नगरे समृद्ध होती. नगरांना आर्थिक जीवनात प्राधान्य होते. कृषि व पशुपालन, उद्योग व व्यापार हे त्यांचे मुख्य व्यवसाय होते. त्यावेळी कुटुंबप्रमुख म्हणून स्त्रियांना सन्मान होता. इत्यादी गोष्टी आम्हाला कळाल्या म्हणजे आमच्या अस्तित्वाची जाणीव ही युगपुरुष खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या प्रबोधनातून आम्हाला करून दिली.
मराठा-बहुजन समाजातील युवकांचे वैचारिक भान सनातन्यांच्या क्रुर षडयंत्रामुळे हरपले होते. समाजाच्या मनुष्यबळाचा गैरवापर केला जात होता. परंतु, खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून हे षडयंत्र हाणून पाडले. मराठा-बहुजन समाजाला वैचारिक दिशा दिली. युवाशक्तीला विधायक कार्यासाठी प्रेरित केले. युवकांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचे आवाहन करुन समाजात जाणीव-जागृती केली. बुटपॉलिश ते तेल मालिश व्यवसायांसाठी तरुणांना प्रोत्साहन दिले.
शिवचरित्र, शंभुचरित्र या विषयांवर लिहण्या-बोलण्यावर मनुवादी वर्गाचे वर्चस्व असल्यामुळे समाजात चुकीचा इतिहास पेरला जात होता. परंतु, युगपुरुष खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून या विषयावर बोट ठेवले. इतिहासाच्या पुनर्लेखनाचे महत्व समाजाला पटवून दिले. शिवशंभुराजांचा सत्य इतिहास लोकांपर्यंत पोचवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक शिवशाहिर, इतिहास संशोधक, वक्ते, लेखक, चित्रकार, नाटककार यांची मोठी फळी निर्माण केली. नव्या इतिहास संशोधक, अभ्यासकांना आपले इतिहासज्ञान अधिक निर्भीडपणे मांडता यावे म्हणून मनुवाद्यांची या क्षेत्रातील मक्तेदारी मोडून काढली. चुकीचा इतिहास लिहणाऱ्या लोकांना जरब बसवली. इतिहासातील अनेक वादग्रस्त विषय मार्गी लावले. एरवी इतिहासाकडे केवळ शंभर मार्कांचा विषय म्हणून बघणाऱ्या समाजाला इतिहासात अस्मिता आणि आदर्श शोधायला शिकवले. लोकांचे मेंदू दुरूस्त करता करता, महापुरूषांचे चारित्र्यहनन करणारे मेंदू उपटण्याचेही काम मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने केले आहे. त्याची उदाहरणे जर पाहायची झाल्यास भांडारकर, दादू कोंडदेव, फेक वाघ्या कुत्रा आणि पुण्यातील राम गणेश गडकरी पुतळ्यावर सर्जीकल स्ट्राईक ...या घटना आठवतील.
शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या कार्याचा आढावा घ्यायला इथे शब्द पुरणार नाहीत. मनुवादी मानसिकतेचे प्रचारक आणि प्रसारक समाजाला अंधश्रद्धा, अंधकार व अधोगतीच्या खाईत लोटण्याचा कार्यक्रम पध्दशीरपणे राबवत असताना खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघ या चळवळीचं रोपटं लावलं, वाढवलं आणि तिचे लोकचळवळीत रुपांतर केले. या चळवळीने महाराष्ट्रात एक सलोख्याचे वातावरण निर्माण केले. समाजातील भेदभावाची दरी कमी करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले. चिंतन-मंथन करुन समाजाच्या भावी प्रश्नांची जाणीव करुन दिली. समाजात एक आनंदाचे व सहकार्याचे वातावरण निर्माण केले. लोकांना एकमेकांशी जोडले. मराठा सेवा संघ आणि ३३ कक्षांच्या माध्यमातून वैचारिकदृष्ट्या नापीक समाजाला सुपीक केले. अज्ञान, अहंकार, भोळेपणा आणि वैचारिक गुलामी दूर करुन समाजाचे मन, मेंदु, मनगट, मणका सशक्त करण्याचे काम केले. समाजाच्या वेळ, श्रम, बुद्धी, पैसा आणि कौशल्य या पंचदानाच्या माध्यमातून शिक्षणसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता आणि प्रचार-प्रसारमाध्यम सत्ता मिळवण्याचे आवाहन केले. हे काम उभे करत असताना स्वतः मानहानीचे विष पचवले, विरोधकांचा वाईटपणा घेऊन समाजाला उभे केले, दिशा दिली आणि समाज म्हणून जगण्याचे विचार दिले.
आर्थिक विकासाच्या वेगाकडे लक्ष देण्याबरोबरच मानवतावाद, लोकशाही, स्वातंत्र्य, विविध धार्मिक-वांशिक-प्रादेशिक-भाषिक अस्मितांची जपणूक व त्यांना आपापल्या विकासाची पूर्ण संधी देत देशाचा विकास करण्याचा मार्ग मराठा सेवा संघ आणि खेडेकर साहेबांनी सुचवला आहे. विज्ञानवादाची मूल्ये समाजाच्या 'डीएनए'मध्ये पेरली आहेत.
एक मराठा सेवा संघ उभा करणे, दिवसरात्र धावपळ करुन तो वाढवणे आणि सलग ३४ वर्षांपर्यंत तो टिकवून ठेवणे या सोप्या गोष्टी नाहीत. हे करत असताना नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व आणि दातृत्वशील लोकं जोडणे, लोकांच्या माध्यमातून समाज जोडणे आणि सातत्याने समाजाच्या प्रश्नावर लिहणारी, बोलणारी, प्रश्न विचारणारी, मत मांडणारी फळी उभी करणे या गोष्टी स्वतःहून करायला जाल तेव्हा त्यातली खोली कळेल. खेडेकर साहेबांच्या ज्ञात, अज्ञात क्षेत्रातील कार्याला मुजरा. युगपुरुष खेडेकर साहेबांना ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक सदिच्छा. त्यांना दीर्घायुष्य लाभो  हीच मॉंसाहेब जिजाऊ चरणी प्रार्थना.

संकलन
शिवश्री तात्यासाहेब पाटील
माजी जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ,  सोलापूर जिल्हा,पंढरपूर विभाग.

शिवश्री निलेश देशमुख, तालुकाध्यक्ष, मराठा सेवा संघ माढा तालुका.

Reactions

Post a Comment

0 Comments