रोजगार मेळाव्याचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर आणि अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नोकरी इच्छूक बेरोजगार उमेदवारांसाठी गुरूवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय (अल्पसंख्यांक विशेष) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, आ.टी.आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट, कोणतीही पदवी, इलेक्ट्रीशीयन, मशीन ऑपरेटर, बी.कॉम, अशा प्रकारची एकुण 1 हजार 374 पेक्षा जास्त रिक्तपदे 13 उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचित केलेली आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी बायोडेटांच्या तीन प्रती आणि कागदपत्रासह गुरुवारी दिनांक 30 जानेवारी, 2025 रोजी ठीक सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत “ अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, 68 आदर्श नगर, कुमठा नाका, सेालापूर ” येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 0217-2992956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती संगीता खंदारे, सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांनी केले आहे.
0 Comments