अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने
स्व. संतोष देशमुख यांना श्रद्धांजली
पुणे (कटूसत्यवृत्त):- अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने स्व. संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात येऊन येत्या गुरुवारी 9 जानेवारी रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्याचे संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व राज्य सरचिटणीस विवेक ठाकरे, वरिष्ठ उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांनी शासनाला कळवत जाहीर केले आहे. संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व अजितदादा पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना इमेलद्वारा याबाबत मागणी निवेदन देऊन कळवले आहे की, राज्यातील सर्वच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचान्यांच्या भावना अत्यंत तीव्र असून लोकप्रतिनिधी म्हणून आणि ग्रामीण महाराष्ट्रातील गाव खेड्यातील सामाजिक वातावरण चांगले राहण्यासाठी सरपंच व सर्वच गावकारभारी असणाऱ्या सहकाऱ्यांना संरक्षण असणं अत्यंत गरजेचे आहे. सरपंच हा पब्लिक सर्हन्ट असल्याबाबत तेलंगणा व राजस्थान उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा निर्णय आहे त्यानुसार सरपंचाच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पूर्वीचे भादवी 353 आताचे भारत न्यायसंहिता 132 प्रमाणे गुन्हा नोंद व्हावा, तरच गावच्या विकासकामात अडथळा आणणाऱ्यावर जरब बसेल. गावच्या हितासाठी समाजसेवेमध्ये भाग घेणाऱ्या सरपंचांना व त्यांना मदत करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण अत्यावश्यक आहे. अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे.
0 Comments