Hot Posts

6/recent/ticker-posts

मूर्तिजापूरचे आ. हरीश पिंपळे यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना बंद खोलीत डांबले .....!

 मूर्तिजापूरचे आ. हरीश पिंपळे यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना बंद खोलीत  डांबले .....!   

    

अकोला (कटूसत्य वृत्त):- अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यातील कुरुम मंडळातील सन 2023 सालातील ५३०  शेतकऱ्यांचा पीएम कृषी विमा हा  विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दादागिरीमुळे रखडले असून. मुर्तीजापुर विधानसभा 32 चे आ. हरीश  पिंपळे यांनी मुर्तीजापुर येथील विश्राम गृहात विम्या  संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन केले  होते. विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा करताना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी  विचारले  शेतकऱ्यांना विमा कंपनीचे पैसे का बर जमा झाले नाहीत या संदर्भात विचारणा केली असता.  आ. यांना त्यांनी खोटे माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली.आकडेवारी देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असता. हरीश पिंपळे हे  शेतकऱ्यांच्या हक्कासाठी  तत्पर असतात. त्यांनी आक्रमक होऊन विमा कंपनीच्या प्रतिनिधींना खोलीत डांबरून बंदिस्त करून ठेवले. जोपर्यंत शेतकऱ्यांचे विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत तुम्हाला खोलीतून सुटका करण्यात येणार नाही. अशी आक्रमक भूमिका आमदार नी घेतली. या आढावा बैठकीला अकोला जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे, तहसीलदार शिल्पा बोबडे, तालुका कृषी अधिकारी गोरे, बहुसंख्या शेतकरी प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.  सन 2024 चे चना व फळबाग यांची मूर्तिजापूर तालुक्यातील  बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे  तक्रारी करून सुद्धा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे शेतकऱ्यांना विमा अनुदान  रकमेपासून वंचित राहावे लागत आहे . 

 राज्याची कृषिमंत्री   माणिकराव शिवाजीराव कोकाटे  लक्ष देतील का.? किंवा विमा कंपनीवर शासन कठोर कारवाई करण्यास कमकुवत पडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरी शासनाने विमा कंपनीवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना विमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.

Reactions

Post a Comment

0 Comments