Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी उल्हास सोनार ; उपाध्यक्षपदी बाबासाहेब लोंढे

 माढा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी उल्हास सोनार ; उपाध्यक्षपदी बाबासाहेब लोंढे 







कोषाध्यक्षपदी राजेंद्र गुंड सर तर सचिवपदी शेखर म्हेत्रे 
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा प्रेस क्लबच्या नूतन अध्यक्षपदी दैनिक सामनाचे उल्हास सोनार तर उपाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे बाबासाहेब लोंढे व कोषाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे मानेगाव प्रतिनिधी व सचिवपदी दैनिक तरुण भारतचे शेखर म्हेत्रे यांची एकमताने निवड करण्यात आली.
माढा प्रेस क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात झालेल्या बैठकीत सन 2025-2026 करिता सदरच्या सर्व निवडी एकमताने झाल्या आहेत.यावेळी प्रेस क्लबचे मार्गदर्शक प्रमोद गोसावी (दैनिक संचार), संस्थापक-अध्यक्ष किरण चव्हाण (दैनिक सकाळ),मदन चवरे (दैनिक पुढारी),विजय राऊत (दैनिक सुराज्य), आयुबखान शेख (दैनिक लोकमत),चारूदत्त माढेकर (दैनिक एकमत),हिम्मत जाधव (दैनिक दिव्य मराठी),संदिप शिंदे (दैनिक दिव्य मराठी व टी. व्हि.9 मराठी वृत्तवाहिनी),अमर गायकवाड (दैनिक लोकमत), वैभव देशमुख (दैनिक सकाळ), अक्षय गुंड (दैनिक सकाळ), विजय चौगुले (दैनिक सकाळ), समाधान लटके (साप्ताहिक सह्याद्री सत्ता),विजय शिंदे (दैनिक एकमत) उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
फोटो ओळी- 1) अध्यक्ष- उल्हास सोनार.
2)उपाध्यक्ष-बाळासाहेब लोंढे 
3) कोषाध्यक्ष- राजेंद्र गुंड सर 
4) सचिव -शेखर म्हेत्रे

Reactions

Post a Comment

0 Comments