Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते महाविद्यालय येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचे उद्घाटन

 नातेपुते महाविद्यालय येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचे उद्घाटन 




नातेपुते (कटुसत्य वृत्त) :-
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय ,नातेपुते येथे दि. १ जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात महाविद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा पद्मजादेवी मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे मार्गदर्शक संचालक  डॅा. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभिनव उपक्रमांचे  आयोजन करण्यात आले. उपक्रमांचे उद्घाटन  महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. रज्जाक शेख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य  यांच्या परिपत्रकानुसार ग्रंथालयात विद्यार्थ्यांकडून प्रकट वाचन करून घेण्यात आले. या कार्यक्रमाला मराठी विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र खंदारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मानवी जीवनात वाचनाचे महत्व स्पष्ट करताना ते म्हणाले, आजच्या तंत्रज्ञान युगामध्ये वाचन संस्कृती मंदावत चाललेली आहे. विद्यार्थी वाचनापासून दूर जात आहे. विद्यासंपादनाचा काळ हा पूर्णपणे वाचनकृतीने भरलेला असतो. पण दुर्देवीने वाचन संस्कृती लोप पावणार की काय अशी भयावह परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत असल्याचे मत त्यानी मांडले. वाचनाचे महत्व सांगताना ते पुढे म्हणाले , वाचनामुळे मन, बुध्दी आणि भावना सजग होण्यास मदत होते. विचार, भावना आणि संवेदना आदींच्या कक्षा रुंदावल्या जातात. वाचन ही एक समाजाला दिशादर्शक ठरणारी सामाजिक चळवळ व्हावी. या हेतूने प्रेरित होऊन वाचनाने आपल्या प्रतिभा शक्तीला चालना मिळते असे विचार मांडले. 
याप्रसंगी अध्यक्षीय मनोगतातून प्र. प्राचार्य डॉ. रज्जाक शेख यांनीही मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री दिलीप शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून वाचन संकल्प महाराष्ट्राचा* या अभिनव उपक्रमागील हेतू कथन केले. या कार्यक्रमाला प्प्रा.अनिल घेमाड प्रा. राजेंद्र साठे, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यकरिता ग्रंथालय सहाय्यक नागराज करपे ,संध्या सूर्यवंशी ज्ञानेश्वर बोराटे यांनी विशेष परिश्रम घेतले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र साठे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. कमल कांबळे यांनी मानले.


Reactions

Post a Comment

0 Comments