अवैध धंदे केल्यास तडीपार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, January 18, 2025

अवैध धंदे केल्यास तडीपार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा इशारा

 अवैध धंदे केल्यास तडीपारपोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा इशारा



मंगळवेढा तालुका (कटुसत्य वृत्त):-
मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी वेळी जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंगळवेढा पोलीस ठाणे रेकॉर्डवरील अवैध धंदे करणाऱ्या इसमांना प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात बोलावून अवैध धंदे त्वरित बंद करुन वर्तणूकीत सुधारणा करावी अन्यथा तडीपार केले जाईल असा इशारा दिला आहे.
मंगळवेढा पोलीस ठाण्याचे वार्षिक तपासणी होणार असल्याने येथील कर्मचारी गेली दहा ते बारा दिवस झाले विविध गुन्ह्यांचा निपटारा करण्यात रात्रंदिवस मग्न असल्याचे चित्र होते. दि. १६ रोजी जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्याला प्रत्यक्ष भेट दिली. पोलीस ठाण्यातील क्राईम विभाग, गोपनीय विभाग, जप्त मुद्देमाल यासह अन्य रेकॉर्डची यावेळी तपासणी करण्यात आली. वार्षिक तपासणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे एक पथक मागील चार दिवसापासून विविध दफ्तरांची तपासणी करण्याकरिता येथे दाखल झाले होते. दुपारी १२ ते सायंकाळी ५.३० या वेळेत पोलीस अधिक्षकांनी पोलीस अंमलदारांची वैयक्तीक दफ्तर तपासणी करुन उत्कृष्ट काम करणाऱ्या पुरुष व महिला पोलीस अंमलदारांना बक्षिस देवून यावेळी सत्कारही करण्यात आला.
शहर व ग्रामीण भागात अवैध धंद्यात गुंतलेल्या व्यक्तींना प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात बोलावून अवैध धंदे न करणेबाबत त्यांचे समुपदेशन केले. अवैध धंदे पुन्हा केल्याचे आढळल्यास व त्यांच्यामध्ये सुधारणा न झाल्या तडीपार करण्याचा गंभीर इशाराही त्यांनी यावेळी अवैध व्यवसायिकांना दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages