दारू नाही दूध प्या या उपक्रमाने नववर्षाचे स्वागत
संभाजी ब्रिगेड चा उपक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पश्चिमात्य देशाचे अनुकरण करून सरत्या वर्षाला निरोप देताना रात्री पार्ट्या करून तरुणाई दारू पिऊन झिंगाट वाहने चालवताना आढळते यापासून रोखण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात दारू नाही दूध प्या या उपक्रमांतर्गत दुधाचे वाटप करण्यात आले यावेळी युवकांनो दारू नाही दूध प्या. दारूने झिंगला संसार भंगला, धूम्रपान मद्यपान, आरोग्याची धूळधाण. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती व्यसनमुक्तीच्या संकल्पनेने करूया नववर्षाचे स्वागत अशा प्रकारचे फलक संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांनी हाती धरले होते. तसेच बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना गुलाब पुष्प देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या संभाजी ब्रिगेड च्या वतीने
गेल्या दहा वर्षापासून युवकांना दारू नाही दूध प्या हा उपक्रम राबविण्यात येत आहे दारूच्या आहारी जाऊन अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत त्यामुळे युवकांनी दारू न पिता दूध पिऊन व्यायाम करणे गरजेचे आहे सदृढ शरीर संपत्ती व उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे युवकांनी पाश्चात्य देशाचे अनुकरण न करता भारतीय संस्कृतीला साजेल असे नववर्षाचे स्वागत करावे या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्रातील श्याम कदम यांनी सांगितले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अरविंद शेळके जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला शहराध्यक्ष मोनाली धुमाळ सिताराम बाबर सुलेमान पिरजादे फिरोज सय्यद संपर्कप्रमुख शत्रु गुण माने शेखर स्वामी, रमेश चव्हाण रमेश तरंगे संजय भोसले सतीश वावरे मल्लिकार्जुन शेवगार दिनेश वरपे शेखर कंटीकर बबन ढिंगणे वैभव धुमाळ दिनेश आवटे गौतम चौधरी सोहेल शेख विकास सावंत आनंदी धुमाळ राजनंदिनी धुमाळ विजया लक्ष्मी धुमाळ ओवी डिंगने आदि उपस्थित होते.
0 Comments