१४ कनिष्ठ अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या; वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांची यादीही तयार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिकेतील विविध विभागात काम करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात १४ कनिष्ठ अभियंत्यांचा विभागीय कार्यालय आणि मुख्य कार्यालयांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
तसेच राजकीय व अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या कनिष्ठ अभियंत्यांच्या यादीही महापालिकेने तयार केले आहे.
महापालिकेत एकाच विभागात तीन वर्षांपासून काम करत असलेल्या कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने झोन विभागातील अभियंता मुख्य कार्यालयातील विभागामध्ये तर मुख्य कार्यालयातील झोन विभागाकडे अशा पद्धतीने बदल्या करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये नगर अभियंता कार्यालयातील स्थापत्य कनिष्ठ अभियंता मोहम्मद हनीफ बक्षी, आरिफ कंदलगावकर, परशुराम बोमकंटी यांची बदली विभागीय कार्यालय क्रमांक ३ व ५ आणि सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये करण्यात आली आहे. तर विभागीय कार्यालय क्रमांक ३ मधील स्थापत्य कनिष्ठ अभियंता हारून सिद्दिकी आणि विभागीय कार्यालय क्रमांक २ येथील कनिष्ठ अभियंता विष्णू कांबळे यांची बदली नगर अभियंता कार्यालयाकडे करण्यात आली आहे.
तर भूमापक सज्जाद शेख यांची बदली भूमी व मालमत्ता विभाग येथून विभागीय कार्यालय क्रमांक ४ येथे करण्यात आली आहे. विभागीय कार्यालय क्रमांक २ आणि ३ येथे कार्यरत भाऊसाहेब गेजगे यांची बदली विभागीय कार्यालय क्रमांक १ व २ येथे, विभागीय कार्यालय क्रमांक ३ येथील संदेश शिंदे यांची बदली विभागीय कार्यालयात, विभागीय कार्यालय क्रमांक १ येथील विवेकानंद स्वामी यांची विभागीय कार्यालय क्रमांक ४, विभागीय कार्यालय क्रमांक ६ व ८ येथील प्रेमनाथ पवार यांची बदली विभागीय कार्यालय क्रमांक ५, विभागीय कार्यालय क्रमांक सहा येथील प्रतीक कोल्हे यांची बदली विभागीय कार्यालय येथे, महापालिका विद्युत विभागातील प्रणोती कदम यांची विभागातील कामकाजासह विभागीय कार्यालय क्रमांक ७, विभागीय कार्यालय क्रमांक ४ व ५ येथील परवेज शेख यांची विभागीय कार्यालय क्रमांक ८ येथे तर विद्युत विभागातील कनिष्ठ अभियंता प्रथमेश कुलकर्णी यांची बदली विभागातच करण्यात आली आहे.
0 Comments