Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे रविवारी वार्षिक अधिवेशन

 सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे रविवारी वार्षिक अधिवेशन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे 44 वे वार्षिक अधिवेशन रविवार दि. 8 डिसेंबर २०२४ रोजी सकाळी 11 वाजता राजश्री शाहू सभागृह, छत्रपती शिवाजी प्रशाला, सरस्वती चौक सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
      महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार हे या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. या अधिवेशनाचे उद्घाटन आ. सुभाष देशमुख , आ. विजयकुमार देशमुख, आ. देवेंद्र कोठे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर मनोहर सपाटे, अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, माजी कार्याध्यक्ष मनोज गोगटे , जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
       अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाची सद्यस्थिती व त्यावरील उपाय या विषयावर परिसंवाद होईल. यावेळी प्रभाकर घुगे , मनोज गोगटे हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी दोन वाजता खुले अधिवेशन होणार आहे. यामध्ये अनुदान तिप्पट करावे, दर्जाबदल , अभ्यासिका यासह विविध ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. या अधिवेशनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे यांनी केले आहे.
        या पत्रकार परिषदेत सारिका मोरे, धोंडीबा बंडगर , कुंडलिक मोरे , जयंत आराध्ये आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments