Hot Posts

6/recent/ticker-posts

अनगर मुलींच्या रग्बी संघाची राज्यस्तरासाठी निवड

 अनगर मुलींच्या रग्बी संघाची राज्यस्तरासाठी निवड



अहिल्यानगर संघावर 15-00 ने मिळवला विजय
अनगर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय, पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मुलींच्या विभागीय रग्बी स्पर्धा नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक विद्यालय फुलगाव (पुणे) येथे पार पडल्या.या स्पर्धेत कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अनगरच्या  19 वर्ष मुलींचा संघ सहभागी झाला.अंतिम सामन्यात अहिल्यानगर संघाबरोबर 15-00 गुणांनी विजय मिळवून विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. 19 वर्ष मुलींच्या या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
यशस्वी खेळाडूंना क्रीडाप्रमुख महादेव चोपडे, दाजी गुंड, बब्रुवान बोडके, रवींद्र बोडके, डॉ. प्रशांत कुलकर्णी, विलास गुंड,अमोल खताळ अर्चना गुंड,चंद्रकांत सरक, हरी शिंदे व पंढरी थिटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या त्यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील, लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, व सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील,प्राचार्य चंद्रकांत ढोले,प्राचार्य डाॅ.चंद्रकांत सुर्यवंशी, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील, मुख्याध्यापक संजय डोंगरे,  यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यशस्वी सर्व खेळाडू व मार्गदर्शक यांचा प्राचार्य चंद्रकांत ढोले  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
चौकट -
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू 
साक्षी राजेंद्र इंगळे
दीपिका मनीष कवितके    श्रेया सुभाष गुंड 
जयश्री रामचंद्र जाधव
गौरी सुभाष शिंदे 
काजल सिद्राम जगताप    गौरी लक्ष्मण गुंड
धनश्री लक्ष्मण गुंड
 मोनाली धनाजी भोसले सानिका शिवाजी पाटील स्वप्नाली लहू आदलिंगे आरती ब्रह्मदेव शिंदे 
या खेळाडूंनी यशस्वी कामगिरी केल्याबद्दल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
फोटो ओळी -राज्यस्तरीय   निवड झालेल्या (रग्बी खेळ प्रकार) खेळाडूंच्या सन्मानप्रसंगी  प्राचार्य चंद्रकांत ढोले उपप्राचार्य महादेव चोपडे पर्यवेक्षक माधव खरात क्रीडा शिक्षक दाजी गुंड, बब्रुवान बोडके,रवींद्र बोडके, चंद्रकांत सरक, विलास गुंड, डॉ. प्रशांत कुलकर्णी,अर्चना गुंड,रंजना उंबरे, अमोल खताळ, महेश बोडके, हरी शिंदे व पंढरीनाथ थिटे आदी


Reactions

Post a Comment

0 Comments