कुमठे कनिष्ठ महाविदयालयात क्रिडा सप्ताहाचे उद्घाटन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संस्थेचे विश्वस्त मा.नगरसेवक श्री जयकुमार माने यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा सप्ताहाचे आयोजन करन्यात आले आहे या निमित्त क्रिकेट स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत.
सदर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री वसंत गुंगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लिटल स्टार इंग्लिश मिडीयम चे समन्वयक श्री मलकारी कोरे, राष्ट्रविकासच्या मुख्याध्यापिका मंगला मोरे मॅडम, श्री अरुण नीळ, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. संजय जाधव उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी श्री वसंत गुंगे यांनी यावेळीअसे मत व्यक्त केले की खेळाडूंनी चांगल्या प्रकारचे खेळाचे प्रदर्शन करून आपल्या महाविदयालयाचे नाव उज्वल करावे .तसेच अशा क्रीडा स्पर्धेमधूनच खेळाडूमध्ये संघ भावना निर्माण होते हीच संघ भावना देशासाठी उपयोगाला आणावी आपले शरीर बळकट करावे मन, मनगट ,मेंदु, सशक्त करावा असे विचार व्यक्त केले .
सदर स्पर्धेची नियमावली प्रा. दीपक शिंदे यांनी सर्व खेळाडूंना सांगितली. पहिल्या सामना 11वी कला विरुद्ध 11वी वाणिज्य यांच्यात झाला. या सामन्यात 11वी कला यांचा विजय 8 खेळाडू राखून विजय झाला.
या स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून प्रा.राजीव निकम द्वितीय पंच म्हणून प्रा बंडोपंत बाबर यांनी काम केले.
गुणलेखकाचे काम प्रा. विजयकुमार वाळके यांनी पाहिले. सामन्याचे समालोचन प्रा. हणमंत शिंदे यांनी केले.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. दादाराव डांगे व प्रा. विनोद थोरात यांनी प्रयत्न केले.
0 Comments