मोहोळच्या चिंचोली एमआयडीसी तीन बांगलादेशी नागरिकांना अटक
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- कोणत्याही वैद्य कागदपत्रांशिवाय तसेच भारत-बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकारी यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या अवैद्य मार्गाने भारतात प्रवेश करून मोहोळ तालुक्यातील चिंचोली काटी एमआयडीसीतील दोन कंपन्यांमध्ये नोकरी व वास्तव्य करताना तीन बांगलादेशी नागरिक आढळून आल्याने मोहोळ पोलिसांनी त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा कलमा अन्वये गुन्हा दाखल केल्याची घटना २६ डिसेंबर रोजी घडली.
दि. २६ डिसेंबर रोजी दहशतवाद विरोधी पथक सोलापूर युनिटला मोहोळ तालुक्यातील चिंचोली एम.आय.डी.सी. येथे बांग्लादेशी नागरिक अनाधिकृत रित्या वास्तव्य व नोकरी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथक सोलापूर युनिट व मोहोळ पोलीस ठाणे यांच्या टीमने संयुक्तिकरित्या मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चिंचोली एमआयडीसीतील कंपनीमधील कामगारांसाठी राहण्याकरता बांधलेल्या खोल्यांमध्ये जाऊन खात्री केली. त्यामध्ये चंचल विष्णु देव उर्फ विश्वनाथ रॉय उर्फ पहन वय २९ व रजा हुजूरअली हुसेन वय-३८ दोघे रा. कटला गाव तहसील कटला, जिल्हा दिनासपूर, बांग्लादेश हे बेकायदेशीर राहत असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांच्या पथकाने चंचल रॉय याच्याकडे अधिक चौकशी करत बांग्लादेश येथील आणखी कोणी साथीदार आहेत काय?अशी विचारणा केली असता त्याने जवळच्याच एका दुसऱ्या कंपनीमध्ये एक साथीदार असल्याचे सांगितले. पोलिसांच्या पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तेथील कामगारांच्या राहण्याच्या खोलीत असलेल्या मीनल शनीचेरा टुडू वय -३० वर्ष रा. फुलयोनी, हॅमरास, डगापाडा, तहसील कटला, जिल्हा दिनासपुर, बांग्लादेश याला ताब्यात घेतले.
याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल गोपाळ साखरे यांनी दिली. तिन्ही अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांना मोहोळ येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना फाळके पोलीस हेड.कॉ. संतोष येळे, पोलीस हेड.कॉ. धनंजय जावळे, नितीन जावळे नागेश उडानशिवे, रामचंद्र जाधव व मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस हेड.कॉ. गोपाळ साखरे, पोलीस कॉ. आनंद डौले यांच्या पथकाने केली.
एजंटाकडून बनवून घेतले आधारकार्ड
अटक करण्यात आलेल्या तिन्ही बांग्लादेशी नागरिकांकडे भारत देशामध्ये येण्याकरता लागणारा पासपोर्ट अथवा कागदपत्रे नव्हती, याबाबत पोलिसांच्या पथकाने त्यांच्याकडे विचारणा केली असता मोबाईल मध्ये आधार कार्ड असल्याचे सांगून आधार कार्ड दाखवले व ते सोलापूर मधून एजंटाकडून बनवून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांचे पथक तपास करत आहे.
0 Comments