विद्यार्थ्यांनी जाणून घेतला इस्रोचा प्रवास
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इस्रोने देशात अनेक अंतराळ मोहिमा यशस्वीपणे राबवून नावलौकिक मिळवला आहे. या संस्थेबद्दल सर्वसामान्यांना फारशी माहिती नसते. ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी आलेल्या इस्रोच्या 'स्पेस ऑन व्हिल्स' च्या माध्यमातून 'एमआयटी'तील विद्यार्थ्यांनी इस्रोच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या अंतराळ प्रवासाची सविस्तर माहिती जाणून घेतली.
या बसचे उदघाटन एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे प्रकल्प संचालक प्रा. प्रभा कासलीवाल
यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऑपरेशन्स आणि प्रकल्प अधिकारी महेश देशपांडे, एम. आय. टी. विश्वशांती गुरुकुलचे प्राचार्य मनीष पुराणी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार गायकवाड, समन्वयिका सरस्वती कांबळे आदी उपस्थित होते. या बसच्या माध्यमातून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मिशनची आणि आतापर्यंतच्या अंतराळ प्रवासाची माहिती देण्यात आली आहे.
यामध्ये चांद्रयान-१ मोहीम, मंगळयान मोहीम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह आणि इस्रोचा आतापर्यंतचा एकूण अवकाश प्रवास सविस्तर बघायला मिळणार आहे.चांद्रयान आणि मंगळयान मोहीम राबविण्यासाठी वैज्ञानिक पध्दती, मोहिमेची माहिती आणि या मोहिमेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या आव्हानांची माहिती दिली आहे. यासोबतच या वाहनात बसवण्यात आलेल्या स्क्रिनच्या माध्यमातून इस्रोच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या अंतराळ प्रवासाची पूर्ण माहिती देण्यात आली आहे.
आयआरएस उपग्रहाद्वारे छायाचित्रित केलेली जगातील काही शहरे येथे आहेत. ही शहरे अंतराळातून कशी दिसतात हे देखील पाहता येते. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कक्षा रूंदावण्यास देखील या उपक्रमाचा उपयोग होत आहे.
0 Comments