Hot Posts

6/recent/ticker-posts

गृहमंत्री शहांनी देशाची माफी मागावी- ठाकरेसेना

गृहमंत्री शहांनी देशाची माफी मागावी- ठाकरेसेना




सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. वावासाहेव आंबेडकर यांच्यावविषयी   अनुदगार काढल्यावद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने करण्यात आली.
शहा यांनी संसदेत वोलताना आंबेडकर यांच्याविषयी अनुद्गार काढले होते. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी पार्क चौकातील डॉ. वावासाहेव आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शने केली. यावेळी अमित शहा माफी मागा, अमित शहा यांच्या संसदेतील विधानाचा निषेध व धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी  बोलताना  जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी यांनी शहा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा धिक्कार केला. दलित व मागासवर्गीयांच्या विरोधात भाजप घेत असलेल्या भूमिकेचाही निषेध केला. भारत देश महामानव
डॉ. वावासाहेव आंबेडकरांच्या घटनेतील तरतुदीप्रमाणे चालत असून शहा यांच्या विधानाने देशातील कोट्यवधी भीमसैनिक, शिवसैनिक, मागासवर्गीय तसेच हुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. अमित शहा यांनी माफी मागावी, अन्यथा भीमसैनिक व आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला.
या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर, शहर प्रमुख महेश धाराशिवकर, उत्तर विधानसभा प्रमुख वाळासाहेव गायकवाड, संघटक प्रकाश चव्हाण, जरगीस मुल्ला, विडी कामगार सेनेच्या पद्मा म्हंता, यंत्रमाग कामगार सेनेचे अजय खांडेकर, उपशहर प्रमुख चंद्रकांत मानवी, दत्ता खलाटे, शिवा ढोकळे, जगदीश कलकेरी, लहू गायकवाड, ओंकार चव्हाण, वंटी वेळमकर, विभागप्रमुख सुरेश जगताप, सुरेश शिंदे, दीपक दळवी, महेश गवळी, कैलास जाधव, राजू पानगावकर, युवासेनेचे राम वाकसे, युवती सेनाप्रमुख पूजा खंदारे उपस्थित होते.

 

Reactions

Post a Comment

0 Comments