२७ डिसेंबर रोजी शहर मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माध्यमिक शिक्षण विभाग व शहर मुख्याध्यापक संघाच्यावतीने शहर मुख्याध्यापकांसाठी शुक्रवार दि. २७ डिसेंबर रोजी तुळजापूर वेस येथील सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्राचे डॉ प्रभाकर बुधाराम हे मुख्याध्यापकांचे प्रशासकीय कामकाज,कार्यपद्धती व अडचणी या विषयावर ,डॉ नेहा जोशी या ताणतणावाचे नियोजन या विषयावर, बी जी कुलकर्णी हे शिक्षक भरती प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.यांच्यासह अन्य महत्त्वाच्या विषयावर माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, माजी राज्य अध्यक्ष सुभाष माने , राज्य अध्यक्ष तानाजी माने आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.तरी शहरातील शाळेच्या मुख्याध्यापकांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे असे आवाहन शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विद्यानंद स्वामी यांनी केले आहे.
0 Comments