Hot Posts

6/recent/ticker-posts

रस्त्यांच्या कामासाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे

 रस्त्यांच्या कामासाठी केंद्रीय मंत्र्यांना साकडे




माढा (कटूसत्य वृत्त):- माढा विधानसभा मतदारसंघाचे आ.अभिजित पाटील यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामावावत निवेदन देऊन संबंधित कामे मार्गी लावण्याची मागणी केली. गडकरी यांनी,केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद देत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.आ. पाटील यांनी निवडणुकीदरम्यान मतदारसंघातील रस्ते चकाचक करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मतदारसंघातील रस्ते पूर्ण व्हावेत, यासाठी त्यांनी केंद्रीय रस्ते महामार्ग वाहतूक मंत्री गडकरी यांची भेट घेऊन माढा मतदारसंघातून जाणारा श्री संत मुक्ताई पालखी महामार्गाला राज्य महामार्ग दर्जा देऊन निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. माढा मतदारसंघातून करमाळा-टेंभुर्णी-करमाळा- टेंभुर्णी-पंढरपूर-मंगळवेढा रस्ता चौपदरी करावा. पंढरपूर (तिऱ्हेमार्ग ) देगाव -सुस्ते- टाकळी सिकंदर- कुरुल रस्ता चौपदरी करावा. याचबरोबर मतदारसंघातील अनेक रस्त्यांच्या कामा बाबत निवेदन देऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी, केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments