Hot Posts

6/recent/ticker-posts

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरदमॅरेथॉन स्पर्धा संपन्न

 शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरदमॅरेथॉन स्पर्धा संपन्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शरचंद्र पवार यांच्या 85 वाढदिवसाच्या आणि शरद नागरी सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय शरदमॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील शहराष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरडमल माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे स्पर्धा संयोजक मनोहर पंत सपाटे चेअरमन महेश माने ज्ञानेश्वर सपाटे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अथलेटिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुरेश पवार सचिव प्रा.राजू पाटील, खो खो संघटनेचे सचिव अजित सांगवे प्रकाश काशीद सुदेश मालप क्रीडा संघटनेचे दशरथ गुरव याबरोबर शहरातील सर्व क्रीडा शिक्षकांच्या मदतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचे संयोजक म्हणून मुख्याध्यापक तानाजी पाटील सुजाता जोगदार जयश्री पाटील प्राचार्य मधुकर पवार त्याचबरोबर संतोष गवळी सचिन गायकवाड राजाराम शितोळे मारुती घोडके नितीन गोरे यांनी केलं. यावेळी स्पर्धेसाठी पोलीस उपायुक्त विजय कबाडे शहर ट्राफिक पोलीस विभागाचे प्रमुख, सोलापूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभाग आणि सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय विभाग यांनी सहकार्य केले.


Reactions

Post a Comment

0 Comments