Hot Posts

6/recent/ticker-posts

कु.समिक्षा मानकुमरे हिची दुबई येथे होणा-या जागतिक पाॅवर लिफ्टींग स्पर्धेसाठी निवड

 कु.समिक्षा मानकुमरे हिची दुबई येथे होणा-या जागतिक पाॅवर लिफ्टींग स्पर्धेसाठी निवड




अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयातील खेळाडू कु.समिक्षा मानकुमरे हिची दुबई येथे होणाऱ्या जागतिक पाॅवर लिफ्टींग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते तिचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.या निवडीमुळे सर्वच स्तरातून तिच्या कौतुकाचा व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
        कु.समिक्षा मानकुमरे हिने नुकत्याच गोवा पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय एशियन पाॅवर लिफ्टींग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले असून तिची दुबई येथे होणाऱ्या जागतिक पाॅवर लिफ्टींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ती शंकरराव मोहिते महाविद्यालयात बी.ए.भाग-२ मध्ये शिकत असून तीला क्रीडा शिक्षक प्रा.अरविंद वाघमोडे, प्रा.दादासाहेब कोकाटे, प्रा.डाॅ. बाळासाहेब भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
           तिची जागतिक पाॅवर लिफ्टींग स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते-पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते-पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील,प्राचार्य शिवप्रसाद टिळेकर,प्रबंधक राजेंद्र बामणे, कार्यालयीन अधिक्षक युवराज मालुसरे,सर्व प्राध्यापक वर्ग यांनी तिचे अभिनंदन करून तिला जागतिक पाॅवर लिफ्टींग स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments