आ. अभिजीत पाटील यांचेकडून माढा बरोबरच पंढरीच्या विकासाचाही पाठपुरावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, December 23, 2024

आ. अभिजीत पाटील यांचेकडून माढा बरोबरच पंढरीच्या विकासाचाही पाठपुरावा

 आ. अभिजीत पाटील यांचेकडून माढा बरोबरच पंढरीच्या विकासाचाही पाठपुरावा




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर आणि माढा विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागावेत यासाठी नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांनी सदस्य पदाची शपथ घेतल्यापासून शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे त्यांनी मतदार संघातील जनतेच्या प्रश्नांसाठी आमदार अभिजीत पाटील यांनी सकाळी साडेनऊ वाजले पासून जेवण न करता रात्री नऊ वाजेपर्यंत सभागृहात थांबून कळकळीने प्रश्नांची मांडणी केली. यातूनच त्यांचे कर्तृत्व सिद्ध होते.
 
नागपूर येथे पार पडत असलेल्या हिवाळी अधिवेशनात सलग तिसऱ्या दिवशी आमदार अभिजीत पाटील यांनी 'अध्यक्ष महोदय' असे म्हणत विधान भवनात पंढरपूर, माढा मतदार संघातील प्रश्नांवर गर्जना केली. 
यावेळी त्यांनी माढा मतदार संघाबरोबरच पंढरपूरच्या अनेक प्रश्नांवर वाचा फोडल्याने पंढरपूर नगरपालिकेची साखर पेरणी केल्याचे दिसून आले.

यावेळी त्यांनी टेंभुर्णी नगरपंचायत संदर्भात अंतिम अधिसूचना काढण्यात यावी.  माढा नगरपंचायत मधील जिल्हा परिषदेच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी निधी उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी व्यवसाय सुरू होऊ शकतील. तसेच शाळेसाठी कंपाउंड वॉल करावे, माढा तहसील कार्यालयाच्या फर्निचर साठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. 

माढा शहरातील प्ले ग्राउंड गार्डनसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. 
माढा शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. 
नाट्यगृह, एसटीपी प्लांट, माढेश्वरी देवी तीर्थक्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. पंढरपूर नगरपालिका मधील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांसाठी नागरिकांनी पैसे भरले असून २०२१ पासून काम बंद आहे, त्याबाबत तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी. 
पंढरपूर नाट्यगृह बांधकामातील भ्रष्टाचाराविषयी सखोल चौकशी करण्यात यावी. 

महाराष्ट्रातून तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूर येथे वारकरी येतात श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागेत स्नान करतात परंतू शहरातील सोडण्यात येणारे घाण पाणी चंद्रभागेच्या नदी पात्रात जाते. या पाण्यावर ट्रीटमेंट करून हे पाणी सोडले जाणे आवश्यक आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केले. 

पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र असून महाराष्ट्रातून भाविकांसाठी १००० खटांचे रुग्णालय सुरू करण्याबाबत जीआर निघाला असून त्याला मंजुरी देऊन जागा उपलब्ध करून देणे. तसेच मेडिकल महाविद्यालयास परवानगी देण्यात यावी. टेंभुर्णी येथे ग्रामीण रुग्णालयात उपकरणांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा.

टेंभुर्णी, करकंब आणि मोडनिंब येथे नगरपंचायत करण्यात यावी. पंढरपूर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं परंतु लहान मुलांना खेळण्यासाठी (गार्डन) बागेसाठी निधी मिळून देखील कामाला सुरूवात झाली नाही. कामास सुरुवात करण्यात यावी.पंढरपूर येथील यमाई तलाव येथे लेझर शो साठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages