अभ्यासाने ध्यान वाढू शकते निष्काम ध्यान शिकले पाहिजे- डॉ. बबन काळे
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- आजच्या युगात ४५ सेकंद ध्यान झाले आहे . अभ्यासानेच ध्यान वाढू शकते. प्रत्येकाचे मन भीती, कल्पना, वासनेत गुंतलेले आहे .निष्काम ध्यान शिकले पाहिजे असे विचार डॉ. बबन काळे यांनी व्यक्त केले.
नातेपुते येथील राज वैभव सांस्कृतिक भवन येथे तेज ज्ञान फाउंडेशन( हॅप्पी थॉट्स) या संस्थेचा रजत जयंती महोत्सवानिमित्त व्याख्यान आयोजित केले होते. समारंभाचे उद्घाटन पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे प्रा.डाॅ. राजकुमार कदम, डॉ.बबन काळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
प्रमुख मान्यवरांचा सत्कार हॅपी थॉटस च्या वतीने करण्यात आला.
यावेळी डॉ. बबन काळे म्हणाले," मनात विचार आले तर येऊ द्यात. गेले तर जाऊ द्यात. स्वतःची ओळख होणे गरजेचे आहे. अहंकार निघून गेला पाहिजे .विवेक बुद्धीचा वापर करावा. आज जागतिक ध्यान दिवस साजरा होत आहे. २०२५ मध्ये प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी व्हावे. ध्यानाचे खूप फायदे आहेत. अनासक्त उत्साह शक्ती भावना तत्व येते .भावना अस्थाई असते. निर्णय योग्य घेता येतात. ध्यानामुळे संपूर्ण स्वास्थ्याचा लाभ होतो. स्वास्थ्य ध्यानातून मिळते. तसेच मौनाचा आनंद मिळतो. मी कोण हे समजते .दररोज ध्यान करणे आवश्यक आहे. यातून जीवनाला नवीन आकार मिळेल. हृदयातील ईश्वर जागा करण्यासाठी हॅप्पी थॉट्स संस्था कार्यरत आहे."
पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर म्हणाले ,"आजच्या जगात आपण भरकटत चाललो आहोत. चांगल्या वागणुकीने उच्च स्तरावर पोहोचू .समाधान मनावर असते. सुख वस्तुत असते. मोबाईल द्वारे फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे आहे. तुमची फसवणूक तुम्हीच रोखू शकता."
यावेळी डॉ.राजकुमार कदम यांनी मार्गदर्शन केले.
या समारंभास फलटण, माळशिरस तालुक्यातील साधक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी हॅपी थॉटस चे पुस्तक व इतर साहित्य यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
चौकटीत....
२१ दिवस दररोज २१ मिनिट, १४ दिवस दररोज १४ मिनिट ध्यानाचा संकल्प करावा..
डॉ.बबन काळे.

0 Comments