सिद्धेश्वर यात्रे निमित्त आयोजित कृषी प्रदर्शनात लोकमंगल कृषी महाविद्यालयाचा सहभाग
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान वडाळा संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा मार्फत सोलापूर ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेनिमित्त दिनांक २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत आयोजित कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या उपयुक्त असलेल्या विविध प्रकारच्या कृषी उत्पादनांचा स्टॉल उभारण्यात आलेला आहे. सदरील स्टॉलमध्ये महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यां मार्फत उत्पादित केले जाणारे जैविक खते, गांडूळ खते, नर्सरी रोपे, दुग्ध जन्य पदार्थ यांचे प्रदर्शन व विक्री शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासोबतच रेशीमशेती, सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला उत्पादन यांच्याशी निगडीत तांत्रिक सल्ला ही शेतकऱ्यांना महाविद्यालयातील तज्ञांच्या मार्फत लोकमंगलच्या दालनवरच थेट मिळत आहे. हे कृषी प्रदर्शन २५ डिसेंबर पर्यंत सुरू असून याचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा आणि लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी निर्मित कृषी सामग्री चा अवलंब करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
0 Comments