Hot Posts

6/recent/ticker-posts

सनराईजर संघ श्री निळकंठेश्वर चँम्पियन ठरले

 सनराईजर संघ श्री निळकंठेश्वर चँम्पियन ठरले




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट रोड पाणी टाकी येथील  पुंजाल क्रीडांगण येथे श्री निळकंठेश्वर चॅम्पियन लीग - 2024 च्या वतीने आयोजित "भव्य टेनिस बाॅल क्रिक्रेट स्पर्धा" मधील अंतिम सामना  सनराजरस व D-11 संघा दरम्यान अंतिम सामना झाला.


शैवटचा षटकापर्यत रंगलेले अंतिम सामन्यात सनराजरस संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. प्रथम पलंदाजी करतांना D -11 संघ 7 षटकात एकुण 73 धावा काढले होते.सनराजरस संघ प्रत्युत्तर देताना ४ चेंडू शिल्लक राखून श्री नीलकंठेश्वर चॅम्पियन्स लीग पर्व -२  चे प्रथम क्रमांकाचे रोख 15000/- रु व आर्कषक चषक पटकावले. उपविजेता D इलेव्हन संघाला रोख 11000/- व आर्कषक चषक गंगाधर आडकी यांचा हस्ते देण्यात आली.

अंतिम सामनाचे सामनावीर पुरस्कार विजय म्हंता यांना देण्यात आली.

उत्कृष्ठ फलंदाज चे पुरस्कार आकाश मादगुंडी यांना दैण्यात आली आहै व उत्कृष्ठ गोलदांज पुरस्कार विजय म्हंता यांना देण्यात आला .उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक चे पुरस्कार नागेश कामुर्ती यांना देण्यात आला.

संपुर्ण मालिका मध्ये सर्वात जास्त धावा काढलेले फलंदाज आकाश मादगुंडी यांना मालीकावीर पुरस्कार साठी "सायकल" भेट देण्यात आली.
 
 यावेळी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख मान्यवर ज्ञाती संस्थेचे सल्लागार देविदास पालमुरे, विश्वस्त खजिनदार श्रीनिवास बंदगी,विश्वस्त हिरालाल धुळम, नागेश टंकसाल,माजी विश्वस्त शंकर बटगिरी , प्रसाद  मुटकिरी, गंगाधर आडकी, सतीश कुणी, लखन रूमांडला , आनंद रेब्बा, ज्ञानेश्वर रेब्बा,  बागप्पा प्रसन्ना, श्रीनिवास कामुर्ती , नरसिंग म्हंता , आनंद मिठ्ठा , लखन मिठ्ठा , डॉ.प्रभाकर  देवरकोंडा , कार्तिक चिकणी, अण्णा पच्चीस संघाचे व्यंकटेश नादरगी उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजक सुमित गडगी , नंदकुमार मुटकीरी, सुनिल धुळम, कार्तिक चीकणी, समर्थ मुटकिरि, साई गिरगाळ ,हिरालाल मादगुंडी यांनी  यशस्वीपणै स्पर्धाचे आयोजन केले आहै.यावेळी मोठया संख्येने समाज बांधव व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments