लेंगरेवस्ती शाळेत आनंदी बाजार उत्साहात संपन्न: २५३७५ रुपयांची उलाढाल
पोखरापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंगरे वस्ती पोखरापूर शाळेत बाल चिमुकल्यांचा आनंदी बाजार-बाजार डे कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच मा.सानिका बालाजी नरुटे, उपसरपंच मा.आशिष आगलावे, ग्रामपंचायत पोखरापूर यांच्या शुभ हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई पुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून रिबीन कापून
झाले. बालाजी नरुटे,रुपेश क्षीरसागर केंद्रप्रमुख पोखरापूर, सुरेश पवार केंद्रप्रमुख मोहोळ, ईश्वर वाघमोडे मुख्याध्यापक तांबोळे यांनी आनंदी बाजारास भेट देवून खरेदी केली व मुलांचे खुप कौतुक केले.
या बाजारात विविध फळे, पालेभाज्या, फळभाज्यांच्या बरोबरच ३५ स्टॉल्समधून चहा,पुरी भाजी, वडापाव,समोसे, पाणीपुरी, भेळ, पापड, शेंगाचटणी, भजे, ईडली सांबर, पोहे,दाल चावल, अंडी अशा खमंग व्हेज व नॉन व्हेज पदार्थ व स्टेशनरी यांची विक्री करण्यात आली.
या आनंदी बाजारात एकूण.२५३७३ रुपयांची उलाढाल झाली.
मा.अविचल महाडीक गटशिक्षणाधिकारी, मा.बंडू शिंदे व मा.मल्लिनाथ स्वामी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मोहोळ यांनी शुभेच्छा दिल्या.
आनंदी बाजारास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विक्रम लेंगरे उपाध्यक्ष दिलीप लेंगरे, सर्व सदस्य,माता पालक -शिक्षक पालक संघ, द्रोणाचार्य लेंगरे, रामहारी लेंगरे, बिराप्पा लेंगरे, खेलूदेव लेंगरे, अनिल लेंगरे,द्वारकेश लेंगरे, तात्या शिंगाडे, संपत लेंगरे व १०० % पालक यांनी भेट देवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व आमचा उत्साह वाढवला आणि आनंदी यात्रेचा मनसोक्त आनंद घेतला.
प्रथमेश लेंगरे, सौख्य लेंगरे, चेतन, पांडू, सोमेश लेंगरे,सुजय लेंगरे,रतन शिंगाडे, प्रणाली लेंगरे, माधुरी लेंगरे, पुनम लेंगरे, दिपाली लेंगरे, शुभांगी बाबर, काजल लेंगरे, आश्विनी लेंगरे, मेघाश्री लेंगरे, रोहीणी लेंगरे, प्रतिक्षा लेंगरे, अक्षदा लेंगरे, श्रावणी लेंगरे यांनी आनंदी बाजाराच्या यशस्वीतेसाठी खुप मेहनत घेतली. आनंदी बाजाराच्या आयोजनाचा हेतू व प्रसावना सांगताना मुख्याधापक राजेंद्रकुमार वाघमोडे यांनी मुलांना व्यवहार ज्ञानाबरोबरच
नफा-तोटा,खरेदी-विक्री, नाणी- नोटा,सुट्टे - बंदे, बेरीज-वजाबाकी, गुणाकार -भागाकार, वजन - मापे, यांचे ज्ञान मिळते हे आवर्जून सांगितले. अंगणवाडी सेविका मंगल म्हमाणे व मदतनीस छायाताई शिंगाडे यांनीही सहकार्य केले
सर्वांचे स्वागत व आभार दादा चव्हाण सर यांनी मानले.
0 Comments