विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मानवी हक्क दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार व सलमान आझमी, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर व सु.रा. मुलींची प्रशाला, सेवासदन सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला.
यावेळी काढण्यात आलेल्या फेरीत सेवासदन प्रशालेतुन सर्व विद्यार्थींनी उर्त्स्फुतपणे सहभाग नोंदविला. फेरी नवीवेस पोलीस चौकी, सरस्वती चौक मार्गे काढण्यात येवुन परत सेवासदन प्रशालेत समारोप करण्यात आले. फेरीमध्ये “माझे हक्क, माझे भविष्य, आत्ताच” या 2024 रोजी मानवाधिकार दिनानिमित्त थीम च्या घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. उमेश देवर्षी, लोकअभिरक्षक विधिज्ञ श्रीमती देवयाणी किणगी, सेवासदनशाळेचे उपमुख्याधिपीका नंदीनी बारभाई, पर्यवेक्षक स्वाती पोतदार, तसेच शाळेतील मिरा केंद्रे, लक्ष्मी कमळे, जयश्री पवार व श्रुती मोहोळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ही रॅली/ कार्यकम यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक एस.ए.जी. नदाफ, कर्मचारी प्रविण विभुते, रहिम शेख, व्ही.टी. शिंदे, शाहरूख पिंढारी इत्यांदींनी परिश्रिम घेतले.
0 Comments