ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा मोहिमेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद- सुदीप चाकोते
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र सेवादलचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते म्हणाले की नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीचे लाट असताना देखील अनाकालनीय निकाल लागला. ज्या पद्धतीने सरकारने निवडणूक आयोगावर दबाव तंत्राचा वापर करून बहुतांशी जागी ज्या पद्धतीने ईव्हीएम मशीन मध्ये मतांचे तफावत दिसून आले व ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्यातील जनतेचे EVM मशीनच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये गडबड करून जनतेला फसवण्यात आले.*
*जनतेच्या मताची फसवणूक होऊ नये म्हणून काँग्रेस च्या वतीने EVM काढून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सही मोहीम राबवण्यात येत आहे.आज रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुनजी खर्गे साहेब, विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधीजी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांच्या आदेशानुसार मा केंद्रीय मंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब ,खासदार प्रणितीताई शिंदे,शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे व महाराष्ट्र सेवादलचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार बाजार जोडभावी पेठ येथे जवळपास 2100 लोकांनी स्वाक्षरी केले.आम्ही दिलेला मत कुठे गेला आहे? आमच्या मतांबरोबर सरकारने थट्टा केली आहे का? स्वाक्षरी करताना अनेक लोकांनी आपले नाराजगी व्यक्त केले व कोणत्याही परिस्थितीत सरकारने आता ईव्हीएम हटवून बॅलेट पेपर वरच मतदान करावे. म्हणून स्वाक्षरी मोहिमेमध्ये मोठ्या आनंदाने व उत्स्फूर्ततेने भाग घेतले. पुढे सुदीप चाकोते म्हणाले की हे स्वाक्षरी मोहीम 25 डिसेंबर पर्यंत राबवण्यात येणार आहे. संपूर्ण शहरात,प्रत्येक चौकात, प्रामुख ठिकाणी व होम टू होम करून संपूर्ण महाराष्ट्रातील स्वाक्षरी दिल्लीला राष्ट्रपती, पंतप्रधान, सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगाकडे एक एक प्रत पाठवण्यात येणार आहे. तरी जनतेने याच्यात सहभाग घ्यावे अशी विनंती केली.
0 Comments