Hot Posts

6/recent/ticker-posts

१४ हजार विद्यार्थ्यांनी रंगविले चित्र; साने गुरुजी पतसंस्थेचा उपक्रम

 १४ हजार विद्यार्थ्यांनी रंगविले चित्र; साने गुरुजी पतसंस्थेचा उपक्रम




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- साने गुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित रंगभरण स्पर्धेत चौदा हजार विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती पतसंस्थेचे संचालक सुनिल चव्हाण यांनी दिली.
    साने गुरुजी शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत ४७ शाळेतील १४ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.मनोरंजनात्मक व स्वच्छतेचा सामाजिक संदेश देणार्‍या चित्रांचा समावेश करण्यात आला होता.पहिली व दुसरी- प्रथम गट,तिसरी व चौथी- गट दुसरा,पाचवी ते सातवी- तिसरा गट अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.प्रत्येक गटातुन प्रथम,द्वितीय,तृतीय व दोन उत्तेजनार्थ क्रमांकाने यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.नितिन खिलारे यांनी  स्पर्धेचे परिक्षक म्हणुन काम पाहिले.स्पर्धा सशस्वी करण्यासाठी  आप्पाराव इटेकर,भीमराया कापसे, विरभद्र यादवाड,सचिन चौधरी,विनोद आगलावे,मुरलीधर कडलासकर,उल्हास बिराजदार, भाऊसाहेब मोरे,जयंत गायकवाड,धनाजी मोरे,शिवानंद हिरेमठ,महादेवी पाटील व फरजाना रचभरे यांनी प्रयत्न केले.

Reactions

Post a Comment

0 Comments