समूह नृत्य स्पर्धेत महर्षी प्रशाला व श्री बाणलिंग विद्यालय सर्वसाधारण विजेतेपदाचे मानकरी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शालेय मुला-मुलींच्या राज्यस्तरीय समुहनृत्य स्पर्धेत शहरी गटात महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला शंकरनगर यांनी तर ग्रामीण गटात श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरस या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
स्मृतिभवन शंकरनगर येथे मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 22 ते 24 डिसेंबर या कालावधीत एकूण पाच गटात स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेच्या समारोपाच्या बक्षीस समारंभा प्रसंगी मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील,
अँड.नितीनराव खराडे पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, उपाध्यक्ष पोपटराव भोसले पाटील, सचिव बिभिषन जाधव, परीक्षक आशिष देसाई, कुणाल मसाले, सागर राऊत, प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्षा स्वरूपारांणी मोहिते पाटील म्हणाल्या, मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळावी या साठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. स्पर्धेचे हे 44 वे वर्ष आहे. तालुक्याच्या बाहेरीलही शाळा यामध्ये सहभागी आहेत. स्पर्धेत शहरी सह ग्रामीण कलाकार ही उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत. कलाकारांनी अपयशाने हार मानू नये. असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी मंडळांने राबवलेल्या विवीध उपक्रमांचा आढावा घेतला.
सर्व विजेत्या संघांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन पोपटराव पवार, डॉ.आर.आर पाटील, किरण सूर्यवंशी, इलाई बागवान यांनी केले.
स्पर्धा प्रमुख मुख्याध्यापक संजय गळीतकर, प्रा. डॉ. विश्वनाथ आवड, दिलीप शिर्के, नामदेव काळे प्रमुख उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल
गट क्रमांक ३ (८ वी ते १० वी - पाश्चिमात्य नृत्य) शहरी गट
प्रथम क्रमांक (विभागून)
सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज, जिजामाता कन्या प्रशाला, अकलूज, द्वितीय महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर.
गट क्रमांक ५ (११ वी ते महाविद्यालय प्रासंगिक नृत्य)
प्रथम क्रमांक सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज,
द्वितीय शंकरराव मोहिते महाविद्यालय, तृतीय महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर
चतुर्थ स.म.शं.मो.पा. इन्स्टि. ऑफ टेक्नो. रिसर्च शंकरनगर,
पाचवा कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय, सदाशिवनगर
गट क्रमांक ४ (५ वी ते १०वी प्रासंगिक, ग्रामीण गट)
प्रथम क्रमांक श्री बाणलिंग विद्यालय, फोंडशिरस,
द्वितीय श्रीमती. रत्नप्रभादेवी मोहिते- पाटील कन्या प्रशाला, नातेपुते, तृतीय कृष्णानंद विद्यामंदीर, पाटीलवस्ती, प्रोत्साहनपर हनुमान विद्यामंदिर प्रशाला, तोंडले.
(5 वी ते10 वी प्रासंगिक शहरी गट)
प्रथम क्रमांक महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला शंकरनगर, द्वितीय सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, व तृतीय जिजामाता कन्या प्रशाला अकलूज यांनी पटकावला.
0 Comments