Hot Posts

6/recent/ticker-posts

मंत्रालयातील माहिती विभागाचा पत्रकार कक्ष सर्व पत्रकारांसाठी खुला

 मंत्रालयातील माहिती विभागाचा पत्रकार कक्ष सर्व पत्रकारांसाठी खुला 


मुंबई (कटूसत्य वृत्त) महाराष्ट्र सरकारच्या माहिती विभागाच्या वतीने मंत्रालयातील शासकीय बैठका, पत्रकार परिषदेचे वार्तांकन पत्रकारांना सुलभ व्हावे म्हणून मंत्रालयाच्या तळमजल्यावर माहिती व जनसंपर्क विभागाचे शेजारी पत्रकार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच माहितीचे जलद गतीने आदान प्रदान करण्यासाठी संगणकासह इंटरनेट सेवा निशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे मंत्रालयात व विधानसभा मंडळातील कामकाजासाठी ही सुविधा सर्व पत्रकारांना उपलब्ध करून देण्यात आली असताना मंत्रालय व विधिमंडळ पत्रकार संघ या अनोंदणीकृत नावाने काही पत्रकारांनी या पत्रकार कक्षाचा ताबा घेऊन ठराविक पत्रकारांनीच या कक्षाचा वापर अनेक वर्ष चालू ठेवला होता. तसा प्रकारचा बोर्ड व संचालक मंडळ बोर्ड पत्रकार कक्षात व बाहेर लावण्यात आला आहे.

 विधिमंडळ व मंत्रालय संपादक पत्रकार संघ या नोंदणीकृत संस्थेचे अध्यक्ष इलियास खान पठाण यांनी माहितीच्या अधिकारात वरील ताबेदारीचा प्रकार उघड केला व माहिती विभागाच्या विभागाचे महासंचालकांना सदर पत्रकार कक्ष सर्व पत्रकारांना खुला करावा असे पत्र लिहून विनंती केली. या पत्राच्या संदर्भाने माहिती विभागाचे संचालक (वृत्त व जन संपर्क) दयानंद कांबळे यांनी दिनांक 20 /12/ 2024 रोजी विधिमंडळ व मंत्रालय पत्रकार संघाचे अध्यक्ष इलियास खान यांना कळविले आहे की, मंत्रालयातील पत्रकार कक्ष व या कक्षातील इंटरनेट व संगणक सुविधा सर्व पत्रकारांसाठी निशुल्क उपलब्ध आहे. तसेच या कक्षात कोणत्याही संघटनेचे फलक महासंचालनालयामार्फत लावण्यात आलेला नाही असे कळविले आहे. त्यामुळे मंत्रालय व विधिमंडळ पत्रकार संघ या संस्थेचे अस्तित्व, बोर्ड हे अनाधिकाराने काही पत्रकारांनी निर्माण केल्याचे उघड झाले आहे.

 पुढील काळात मंत्रालयातील शासकीय कामकाजासाठी आलेल्या पत्रकारांसाठी मंत्रालयातील पत्रकार कक्ष उपलब्ध राहील तसेच कोणत्याही संस्थेच्या नावाचे बोर्ड अथवा अधिकार दाखविता येणार नाही. असे विधिमंडळ व मंत्रालय संपादक पत्रकार संघ संस्थेचे अध्यक्ष इलियास खान यांनी नमूद केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments