Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रद्धा संकुल मध्ये आय.टी.एस आणि अबॅकस कार्यशाळेचे आयोजन

 श्रद्धा संकुल मध्ये आय.टी.एस आणि अबॅकस कार्यशाळेचे आयोजन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आजच्या स्पर्धात्मक युगात आपला पाल्य आत्मविश्वासपूर्वक, सकारात्मक मनस्थितीत अभ्यास करून यशस्वी व्हावा. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी , स्पर्धा परीक्षेचे ज्ञान त्यांना आता पासून मिळावे व त्यांच्यातील स्पर्धा परीक्षेची भिती कमी व्हावी आणि विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढावा त्यासाठी  ज्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन उच्च पदावरती झेप मिळवली आहे. अशा निष्णांत मार्गदर्शकाच्या उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी संस्थापक सचिव सुनील झाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ञ  रविंद्र देशमुख, अबॅकस एक्सपर्ट सौ.वैशाली विभूते हे  होते . तर विषेश मार्गदर्शक म्हणून  आ. टी.एस जिल्हा प्रमुख श्री अंतरेश्वर नाईकवाडी स्पर्धा परीक्षेत निपूण असणारे  सुशील आवताडे, सविता पाटोळे इ. मार्गदर्शक म्हणून या कार्यक्रमास लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता आरबळकर यांनी केले तर आभार पौर्णिमा सुरवसे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक मिलन ढेपे, व्यवस्थापिका धरती पाटील मुख्याध्यापिका वीणा कदम मुख्याध्यापक फुलचंद साळुंखे शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी,  पालक व विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments