81 वर्षाच्या आजीबाईचे चोरी गेलेले सोन्याचे डोरले नातेपुते पोलीस ठाणे यांनी केले परत, आजीबाईचा चेहऱ्यावर फुलले हासू
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी नातेपुते बस स्टॅन्ड येथून ८१ वर्षाच्या आजीबाई भामाबई लक्ष्मण कर्चे वय -८१ वर्ष राहणार - पिंपरी तालुका माळशिरस जिल्हा - सोलापूर ह्या नातेपुते बस स्टँड येथून दहिवडी बस मध्ये चढत असताना गर्दीचा , वयस्कर असल्याचा फायदा घेऊन त्यांचे गळ्यातील जवळपास १ तोळा वजनाचे ४०हजार रुपये किमतीचे जुने वापरते त्यांच्या गळ्यातील दोन डोरले व मनी मंगळसूत्र चोरून नेले होते त्याबाबत नातेपुते पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात होता त्या गुन्ह्याचा तपास नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संदेश पवार हे करत होते त्यांनी सदर गुन्ह्यात आरोपी नामे -1) राधाबाई रामदास शिंदे 2) रुक्मिणी छगन भोसले दोन्ही राहणार, अमळनेर - बीड 3) विमल कुमार लोखंडे रा, बारामती पुणे यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल ताब्यात घेतला व मिळालेला सदर चोरीतील मुद्देमाल माळशिरस कोर्टाचे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री, यु बी पेठे यांनी मूळ फिर्यादी यांना परत देणे बाबत आदेश दिल्याने मुळ फिर्यादी यांना नातेपुते पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे हवालदार रवींद गायकवाड, नवनाथ माने, सोमनाथ मोहिते, राहुल वाघमोडे सह महिला पोलिस अंमलदार नेहा बोंदर, वैशाली शेंडगे यांनी आजीबाईचा सन्मान करत दोन डोरले व मनी मंगळसुत्र परत केले . त्यामुळे ८१ वर्षाच्या आजीबाईंनी पोलीस व न्यायालयाचे आभार व्यक्त केले असून आमच्या जमण्यात एकमेकांवर विश्वास होता, असे बेविश्वासू लोक नव्हते, माझे जून्या आठवणीचे मंगळसुत्र माझेच मला परत मिळाल्याने त्यामुळे प्रामाणिक असणाऱ्या पोलीस प्रश्नाचे मी आभार व्यक्त करते असे उदगार आजीबाईंनी काढले. डोरले व मनी मंगळसूत्र मिळाल्याने त्यांचें चेहऱ्यावर हास्य फुललेले होते.
0 Comments