Hot Posts

6/recent/ticker-posts

तपोरत्नं पुण्यस्मरण :

 तपोरत्नं पुण्यस्मरण 



 नेताजी शिक्षण संस्थेत २४८८ विद्यार्थ्यांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री ष.ब्र. तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त नीलम नगर येथील नेताजी शिक्षण संस्थेत आयोजित चित्रकला स्पर्धेत २४८८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पाच गटामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या.
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली- दुसरी, तिसरी- चौथी अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. ६७३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजशेखर पाटील, जगदेव गवसने, प्रशांत बत्तुल, भारती नरोळे ,सुनीता पवार, कल्पना आकळवाडी आदींनी परिश्रम घेतले. नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत २१५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले.पहिली-दुसरी,तिसरी- चौथी,पाचवी-सहावी,सातवी- आठवी-नववी अशा चार गटात स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजश्री कोळी, संगीता कुडक्याल, योगिता नरोणे, कांचन कंदीकटला आदींनी परिश्रम घेतले. नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल येथे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत ६४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले. पाचवी-सहावी,सातवी-आठवी-नववी अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शैलेश स्वामी, विश्वाराध्य मठपती,शिवानंद पुजारी, गणपती पाटील आदींनी परिश्रम घेतले. विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ८४० विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतले.लहान गट,पहिली-दुसरी,तिसरी-चौथी अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आशा गायकवाड, भौरम्मा रेके ,शिवगंगा दिवटे वैशाली गुजर, सुजाता फुलारी,किरण साळुंके , मल्लिकार्जुन बिराजदार, रविकांत पोतदार ,विशाल खाडे, बजरंग शिरसाट आदींनी परिश्रम घेतले. राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेत १२० विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा दिले.आठवी-नववी या गटात स्पर्धा घेण्यात आला.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  कल्लप्पा कुंभार, चंद्रकांत पाटील, रोहित हत्तरकी संगीता नरगिडे आदींनी परिश्रम घेतले.


Reactions

Post a Comment

0 Comments