कारसेवक राम भक्त कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ व शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून रांजणगाव गणपती येथे 109 जणांचे रक्तदान संपन्न
शिरूर (कटूसत्य वृत्त):- विश्व हिंदू परिषद, बजरंग दल प्रखंड रांजणगाव गणपती तर्फे अयोध्या येथील कार सेवेत कै. राम कोठारी कै शरद कोठारी या रामभक्त यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .
मंगळवार दि. 8 डिसेंबर रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्त्दान शिबीरात 109जणांनी रक्तदान करुन शिबीराला उत्स्फृर्त प्रतिसाद दिला .
श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात भविष्यात प्रभु श्रीरामांचे भव्य असे मंदिर व्हावे ही इच्छा ठेऊन स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या कारसेवकांच्या, हुतात्मे कोठारी बंधुंच्या स्मरणार्थ दरवर्षी बजरंग दलाच्यावतीने देशभर रक्तदान शिबीर राबविले जाते. वर्षभरात गरज लागल्यास १ रक्त पिशवी मोफत देण्यात येणार आहे . हे शिबीर यशस्वी करण्या साठी सोमनाथ बांदल नानासाहेब लांडे .रवी जगदाळे .सचिन कुटे .विलास बत्ते .सुनील शेळके .योगेश कोल्हे सचिन भेंडारकर .विकास फंड .
आदिनाथ नरवडे .आदित्य सनसे गणेश पाचुंदकर प्रविण लुगडे . संतोष पानसरे .औदुंबर साळुंखे .
प्रणव राऊत .श्रीकांत राजने .आदींनी प्रयत्न केले . या शिबीरासाठी शिक्रापूर रांजणगाव गणपती आणि पंचक्रोशीतील सर्वांनी मोलाचे सहकार्य केले
0 Comments