Hot Posts

6/recent/ticker-posts

अनियमित पाणीपुरवठा, स्वच्छता बाबत नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन

 अनियमित पाणीपुरवठा, स्वच्छता बाबत नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदन




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- गेल्या अनेक दिवसापासूनू नातेपुते शहरतील नागरिकांना नगरपंचायतच्या अनियोजित  कारभारामुळे अनियमित पाणी टंचाई व अनेक प्रभागात साफसफाई  स्वच्छतेच्या दुर्लक्षतेबाबत नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनियमित पाणीपुरवठा शहरातील साफसफाई स्वच्छतेबाबत बाबत नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी निवेदन दिले. या निवेदनामध्ये म्हणण्यात आले आहे की, नातेपुते शहराला   एवढी मोठी २४ तास पाणीपुखठा योजना मंजूर आहे त्याचे काम पूर्ण आहे. दरोज नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे,  ज्या दिवशी पाणी सुटणार नाही त्या दिवशीच्या सूचना दिल्या जात नाहीत ज्या दिवशी पाणी सुटणार नाही त्या दिवशी नगरपंचायत कडून सूचना दिल्या गेल्या पाहिजेत, नगरपंचायतीला वाटेल तेव्हा पाणी सोडले जाते, , नातेपुते शहरातील सर्व प्रभमागांना पाण्याच्या बाबतीत एकसमान न्याय द्यावा, नगरपंचायत व विद्युत महामंडळ यांच्यामध्ये समन्वय राखून पाण्याचे वेळापत्रक तयार करावे. तसेच अनेक प्रभागांमध्ये  स्वच्छतेसाठी साफसफाई साठी नेमलेले कर्मचारी प्रभागामध्ये साफसफाई करण्यासाठी जात नाहीत त्यामुळे त्या ठिकाणी कचरा व घाण साठून दुर्गंधी मुळे  आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात नेमलेले ठेकेदार स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे पाण्याच्या केलेल्या गैरसोयीमुळे व स्वच्छतेकडे केलेल्या दुर्लक्ष अभावी यावर्षीची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी अन्यथा राष्ऱवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने  सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना दिला.

Reactions

Post a Comment

0 Comments