Hot Posts

6/recent/ticker-posts

स्व.ॲड कृष्णात बोबडे यांच्या स्मरणार्थ टेंभुर्णी भूषण पुरस्कार व विविध कार्यक्रमांचे आयोजन

 स्व.ॲड कृष्णात बोबडे यांच्या स्मरणार्थ टेंभुर्णी भूषण पुरस्कार व विविध कार्यक्रमांचे आयोजन







टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- स्व.ॲड कृष्णात बोबडे यांच्या स्मरणार्थ १५० महिलांना शिलाई मशीन,१५५ बांधकाम कामगारांना साहित्य संच,१६ आरोग्य सेविकाना कपाट भेट तसेच टेंभुर्णी भूषण पुरस्काराचे वितरण अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य योगेश बोबडे यांनी दिली.
स्व.ॲड कृष्णात बोबडे यांचा शुक्रवारी 'स्मरण दिन' आहे.यानिमित्त अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त आदर्श उद्योजक,आदर्श माता,आदर्श कुटूंब व आदर्श कृषी उद्योजक यांना त्या-त्या क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल ॲड कृष्णात बोबडे यांच्या नावे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी स्मरण दिनानिमित्त क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघास एक लाख,११ हजार ३३३ रु,द्वितीय ६१ हजार ३३३ रु,तृतीय ३१ हजार ३३३ रु,चतुर्थ २१ हजार ३३३ रु.रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास माजी खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर,माजी आ.संजयमामा शिंदे,जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे,संजय (बाबा) कोकाटे,संजय पाटील-भिमानगरकर,शिवाजी कांबळे,प्रा.सुहास पाटील हे मान्यवर व  माढा तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन योगेश बोबडे यांनी केले आहे.हा कार्यक्रम शुक्रवारी दु.४ वा.शिवतीर्थ मैदान सनराईज स्कुल शेजारी,करमाळा रोड टेंभुर्णी येथे आयोजित केला आहे.
 २)कै. बोबडे 3) संजय मामा शिंदे 1)मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर 

Reactions

Post a Comment

0 Comments