Hot Posts

6/recent/ticker-posts

संस्कारक्षम पिढी घडविणे ही पालकांची जबाबदारी- संतोष परंडवाल

 संस्कारक्षम पिढी घडविणे ही पालकांची जबाबदारी- संतोष परंडवाल




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आजच्या पिढीला आई-वडिलांच्या कष्टाची जाण नाही. आपला पाल्य हाच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. सध्याच्या संस्कृतीत मुलांचे भावना बोथट होत आहेत. मुलांना फार शिकवण्या बरोबर राष्ट्रसेवा, देशसेवा , वृध्द आईवडिलांची सेवा करण्यासाठी प्रेरणा देऊन संस्कारक्षम पिढी घडविण्याचे पालकांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन मुंबईचे स्काऊट गाईड उपायुक्त संतोष परंडवाल यांनी केले .
नेताजी सुभाष चंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमालेप्रसंगी दुसरे पुष्प गुंफताना मुंबईचे स्काऊट गाईड उपायुक्त संतोष परंडवाल बोलत होते. 'श्रमसंस्कार आणि पालकत्व' हे त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
परंडवाल पुढे म्हणाले,पालकांनी मुलांची नाळ आपल्याजवळ बांधून घेतली पाहिजे. आपल्या कन्येला चांगले संस्कार देणे गरजेची आहे. शिकलेले आई वडील रिल्स बनवण्यात वेळ घालवत आहेत ही खुप मोठी शोकांतिका आहे. मुलांना ,अपमान झाला तरी पचवण्याची सामर्थ्य हे पालकांनी शिकवणे काळाची गरज आहे.शिक्षक हा निर्माता असून भविष्य देण्याचे कार्य करीत असतो.यावेळेस त्यांनी अमिताभ बच्चन, थॉमस एडिसन , रजनीकांत, धीरुभाई अंबानी यांनी पालकांच्या संस्कारामुळे व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्या जीवनामध्ये यशस्वी भरारी मारली असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रमसंस्कारातून पाल्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे काळाची गरज आहे. पाल्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी सुद्धा श्रमसंस्कार महत्त्वाचे आहे.बालपणी केलेले संस्कार हे आयुष्यभर टिकत असते. पालकांनी जागरुक पालकत्वाची जबाबदारी घेऊन लहानपणापासूनच संस्कार करावे. आपल्या मुलांमध्ये सामाजिक विकासांचे कौशल्य विकसित करणे काळाची गरज आहे. पालकांनी मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होण्यासारखे वर्तणुक करु नये. ज्यामुळे मुलांचे व्यक्तिमत्व विकास बिघडत जाते. पालकांच्या नकारात्मक आणि सकारात्मक विचारावरच मुलांचे व्यक्तिमत्व घडत असते. लहानपणी केलेले संस्कार हे मोठेपणी माणूस म्हणून रूपांतरित होते. संस्कारातून समाजसेवेचा वसा मिळत असतो. शारीरिक कष्ट आणि बौद्धिक श्रम यातून श्रम संस्कृती ही निर्माण करण्याचे पालकांचे कर्तव्य आहे.आपल्या विचारांची दिशा बदलल्यास आपल्या जीवनाची दशा बदलेल असे त्यांनी शेवटी सांगितले.
तत्पूर्वी तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन वक्ते संतोष परंडवाल, पोलिस निरीक्षक नागेश येणपे, संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार, खजिनदार ललिता कुंभार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर, सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले यांच्या हस्ते करण्यात आले.


Reactions

Post a Comment

0 Comments