Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रंथ पालन प्रशिक्षणाचा लाभ जनतेनी घ्यावा -ग्रंथमित्र मोरे

 ग्रंथ पालन प्रशिक्षणाचा लाभ जनतेनी घ्यावा -ग्रंथमित्र मोरे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माहिती तंत्रज्ञानाच्या त्याचप्रमाणे ग्रंथप्रेमी नागरिकांना आधुनिक युगात ग्रंथालयाचे ग्रंथालय शास्त्रावर आधारित अद्ययावत व्यवस्थापन, ग्रंथालयीन सेवा आणि कामकाज, त्याचप्रमाणे भविष्यातील ग्रंथालय पुढील आवाहने, या बाबतचे सर्वसमावेशक ग्रंथपालन प्रमाणपत्र परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाने नवीन सुधारित सहा महिन्याचे ग्रंथ पालन प्रशिक्षणाची निर्मिती केली आहे. या प्रशिक्षणाचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थानी लाभ घ्यावा, असे आवाहन वर्गाचे वर्गव्यवस्थापक ग्रंथमित्र कुडलिक मोरे यांनी केले आहे.

या प्रशिक्षणाची मुख्य परीक्षा जून, महिन्यात होणार असून सोलापूर येथील प्रशिक्षण केंद्रावर होणार आहे. सदर प्रशिक्षण सुरू करण्यास जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर या जिल्हास्तरीय संस्थेस दरवर्षीप्रमाणे मान्यता मिळाली आहे. प्रशिक्षणाचा लाभ शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार युवक युवती शासकीय, निमशासकीय, कार्यालयातील कर्मचारी, शाळा कॉलेजचे कर्मचारी, खाजगी आस्थापनेवरील कर्मचारी यांना होणार आहे. हे प्रशिक्षण मराठीमध्ये राहणार असून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रवेशाकरिता मूळ शैक्षणिक प्रमाणपत्राची व वयाची अट नाही. प्रशिक्षणानंतर विविध ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. सदर प्रशिक्षण सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या जुना पुना नाका सोलापूर येथे दर आठवड्यातील शनिवारी व रविवारी राहणार आहे. या प्रशिक्षणाचे प्रवेश अर्ज व माहितीपत्रक कार्यालयीन वेळेत प्राप्त होणार आहेत. या प्रशिक्षणाचे प्रवेश अर्ज करिता इच्छुकांनी सकाळी ११ ते ५ या वेळात स्वतः प्रत्यक्ष संपर्क करून प्रवेश अर्ज प्राप्त करून प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी. ग्रंथ प्रेमी नागरिकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र विजय पवार, कार्यवाह साहेबराव शिंदे, वर्गाचे व्यवस्थापक ग्रंथमित्र कुडलिक मोरे यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments