जिल्हास्तरीय लंगडी स्पर्धेत तेलगाव शाळेला प्रथम क्रमांक .
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हास्तरीय लंगडी स्पर्धेमध्ये तेलगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी लहान गटात प्रथम क्रमांक मिळवला.तर लहानगटात मुलानी लंगडी स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले.
उत्तर सोलापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकार सिद्धेश्वर निंबर्गी विस्ताराधिकारी बापूराव जमादार डोणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख बी.डी कोळी शाळेच्या मुख्याध्यापिका - माधुरी जाधव . तसेच तेलगाव चे सरपंच रेवनसिद्ध पुजारी , उपसरपंच काजल बनसोडे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष - दत्तात्रय छत्रे ,उपाध्यक्ष -सचिन पाटील तसेच इतर सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आदींनी विजेत्या संघाचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक -श्याम जाधव ,शिवाजी भोसले, प्रदीप पाटील ,प्रदीप माने ,जलराणी काडादी आदींचे मार्गदर्शन लाभले
0 Comments