महान पोलीस चौकीवर गोवंश विक्रेत्याकडून प्रचंड दगडफेक; आरसीपी
पोलीस घटनास्थळी दाखल: तगडा बंदोबस्त :२० लोकाविरुद्ध कारवाई
अकोला (कटूसत्य वृत्त):-पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतील महान पोलीस चौकीवर सोमवारी सकाळी साडेबारा वाजताचे सुमारास एका गोवंश विक्रेत्याकडून आणि त्याच्या काही सहकार्याकडून पोलीस चौकीवर प्रचंड दगडफेक केल्याची घटना घडली , स्वप्निल बर्गे नावाच्या एका पोलीस शिपायाला दगड मारला असल्याची माहिती सुद्धा समोर आली , त्यामुळे महान येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सध्या परिस्थितीमध्ये तणापुर्ण शांतता असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी आमच्या जिल्हा प्रतिनिधींना दिली
प्राप्त माहितीनुसार, पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा महान येथे मोठ्या प्रमाणात गोवंशची विक्री होत असल्यामुळे चौकीतील कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी साडेबारा वाजता सुमारास कारवाई साठी घटनास्थळ गाठले, पोलिसांनी घटनास्थळावरून एक गोवंशसुद्धा आणला आहे, ही कारवाई होताच, गोवंशविक्रेता व त्याच्या सहकाऱ्यांनी एकच गदारोळ करून चौकीवर प्रचंड दगडफेक केली, यावेळी पोलीस चौकीमध्ये केवळ जमादार सुभाष पारधी, भिकासिंग जाधव, आणि पोलीस शिपाई स्वप्निल बर्गे हे तीनच कर्मचारी चौक मध्ये हजर होते, स्वप्नील बर्गे नावाच्या पोलीस शिपायाला दगड मारला असल्याची माहिती समोर आली आहे, या घटनेमधून एक सत्यता अशी मिळाली की, त्यांना दिले..... मग आम्हाला का नाही दिले? या घटनेवरून हे प्रकरण पेटले असल्याचे समजते,याबाबत गावकऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांना माहिती दिली, आणि त्यांनी घटनेची तात्काळ दखल घेऊन आर पी सी पोलिसांचा ताफा दाखल केला आहे, सध्या परिस्थितीमध्ये गोवंश विक्रेता अलीमचंदानी याला अटक केली आहे, पोलीस या घटनेवरून वीस लोकाविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती पिंजरचे थानेदार गंगाधर दराडे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे, दरम्यान, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हरीश पिंपळे यांनी सुद्धा या घटनेची दखल घेतली आहे, आणि पोलीस यंत्रणेला ताबडतोब कारवाई करण्याचे आदेशित केले आहे, असा गंभीर प्रकार घडू नये, ही बाब अतिशय निंदनीय आहे, त्यावेळी पोलिसांनी दोषी विरुद्ध तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी देखील यादरम्यान आमदार हरीश पिंपळे यांनी केली , घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे , अकोला एलसीबी ची टीम,
व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असल्याची माहिती आहे, सध्या परिस्थितीमध्ये महान पोलीस चौकी समोर आरपीसी जवान पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू केले असल्याचे समजते, सध्या परिस्थितीमध्ये महान येथे शांतता आहे, पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे हे करीत आहेत,
0 Comments