Hot Posts

6/recent/ticker-posts

दारू नाही दूध प्या या उपक्रमाने करणार नववर्षाचे स्वागत.

 दारू नाही दूध प्या या उपक्रमाने करणार नववर्षाचे स्वागत. 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- पश्चिमात्य देशाचे अनुकरण करून सरत्या वर्षाला निरोप देताना रात्री पार्ट्या करून तरुणाई दारू पिऊन झिंगाट वाहने चालवताना आढळते यापासून रोखण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मध्यरात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात दारू नाही दूध प्या या उपक्रमांतर्गत दुधाचे वाटप करण्यात येणार आहे तसेच बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना गुलाब पुष्प देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत संभाजी ब्रिगेड च्या वतीने 

गेल्या दहा वर्षापासून युवकांना दारू नाही दूध प्या हा उपक्रम राबविण्यात येत आहे दारूच्या आहारी जाऊन अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत त्यामुळे युवकांनी दारू न पिता दूध पिऊन व्यायाम करणे गरजेचे आहे सदृढ शरीर संपत्ती व उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे युवकांनी पाश्चात्य देशाचे अनुकरण न करता भारतीय संस्कृतीला साजेल असे नववर्षाचे स्वागत करावे या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी दिली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments