व्यसन हे युवा पिढी नष्ट करत आहे - पोलीस निरीक्षक अतकरे
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- व्यसन हे युवा पिढी नष्ट करत आहे त्यावर वेळीच प्रबोधन करायला हवे असे उद्गार मोहोळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे यांनी काढले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नागनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज यांच्या विद्यमाने 31 डिसेंबर हा व्यसनविरोधी दिन म्हणून मोहोळ शहरातून रॅली काढण्यात आली . त्या रॅलीचे उद्घाटन प्राचार्य बागवान सर यांच्या हस्ते करण्यात आले मोहोळ नगरपरिषदेसमोर रॅलीला प्रबोधन करताना मोहोळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक नितीन अतकरे तसेच आकाश फाटे विनोद कांबळे यांनी मार्गदर्शन केले रॅलीमध्ये व्यसन सोडा निर्धार करा व्यसनाचा करा अधिकार व्यक्तीचा करा स्वीकार हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर खाणार नाही गुटखा पिणार नाही बियर अशा जोशपूर्ण घोषणा प्रतीक्षा लेंगरे , अंजली मळगे , कुमोदिनी दांईगडे यांनी दिल्या .
त्यासाठी प्रा .शिंदे एस बी माधव पाटील अनुराधा पाटील उज्वला कदम मनोहर गोडसे , धर्मराज चवरे , सुधाकर काशीद यांनी परिश्रम घेतले
प्राप्तविक धर्मराज चवरे सुत्रसंचलन सुधाकर काशीद आभार मनोहर गोडसे यांनी मानले
0 Comments