Hot Posts

6/recent/ticker-posts

उत्तर'च्या विज्ञान प्रदर्शनात शेख , जाधव , कोळी ,माने, घोळवे, पाटील प्रथम

 उत्तर'च्या विज्ञान प्रदर्शनात शेख , जाधव , कोळी ,माने, घोळवे, पाटील प्रथम




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी शिक्षण संकुलात आयोजित ५२ व्या उत्तर सोलापूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शेख , जाधव , कोळी,माने, घोळवे, पाटील आदींनी प्रथम क्रमांक पटकाविला. 
प्राथमिक गटातून  जुनैद शेख, आर्यन जाधव( हर्षवर्धन हायस्कूल तळे हिप्परगा) ,
यासीन इनामदार (प्रणितीताई शिंदे विद्यालय ),श्वेताली बंडगर  ( जि प शाळा तेलगाव सिना) अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविले.
माध्यमिक गटातून समीक्षा कोळी ,नम्रता माने (हर्षवर्धन हायस्कूल तळे हिप्परगा ), कृष्णा मनोहर, रामू गुडूर (धर्मणा सादुल प्रशाला), सायरीज पठाण , तनिष्का कोकाटे (सिंहगड पब्लिक स्कूल ) आदींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविले. शिक्षक प्राथमिक गटातून सुजाता घोळवे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिटणे) प्रथम तर शिक्षक माध्यमिक गटातून शीतलकुमार पाटील (राजराजेश्वरी माध्यमिक प्रशाला) प्रथम क्रमांक पटकाविले. प्रा. बसवराज साखरे (दयानंद कॉलेज ),प्रा.धनंजय जिडगीकर (वालचंद कॉलेज),प्रा. आय.बी. शेख (सोशल कॉलेज) आदी परिक्षकांनी १३२ विज्ञान साहित्यांची निकषानुसार परिक्षण केले.
 बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे राष्ट्रपती पुरस्कार विजेते सिद्धेश्वर म्हेत्रे, नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी ,विज्ञान विषय साधन व्यक्ती चंद्रकांत वाघमारे , शेळगीचे केंद्रप्रमुख विकास पाटील ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर, विजयकुमार हुंल्ले ,सुभाष धुमशेट्टी, प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, विज्ञान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय जवंजाळ आदी मान्यवरांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी सिद्धेश्वर म्हेत्रे म्हणाले , शोध घेणे म्हणजेच शिक्षण होय. विद्यार्थ्यांनी नेहमी आपली बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी शोध करीत रहावे.असे विद्यार्थीच पुढे मोठे वैज्ञानिक बनतात असे प्रतिपादन केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवकुमार शिरूर, शीतल पाटील, चंद्रकुमार कुंभार, संतोष प्रचंडे, प्रशांत बत्तुल, राजशेखर पाटील, जगदेव गवसने, भाग्यश्री महाजन, वैशाली इंडे ,सुनीता पवार कल्पना आकळवाडी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती पाटील यांनी केले.


Reactions

Post a Comment

0 Comments